🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.......!


🌟उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्नशील राज ठाकरेंचं वक्तव्य 🌟

 ✍️ मोहन चौकेकर

💫 अनिल देशमुखांना अहवालात क्लीन चिट नाही,न्यायमूर्ती. चांदीवाल यांचा गौप्यस्फोट ; अहवालात क्लीन चिट शब्द नसेल, पण माझ्याविरुद्ध कुठलेही पुरावे नाहीत असा उल्लेख,अनिल देशमुखांचा दावा 

💫 सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना तर अनिल देशमुखांकडून देवेंद्र फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न, पण मी ते रेकॉर्डवर घेतले नाही न्या.चांदीवाल यांचा दावा ; सचिन वाझे अत्यंत हुशार माणूस होता,त्याच्याकडे भरपूर मटेरिअल होतं,पण पुराव्याअभावी रेकॉर्डवर घेण्यात अडचण,परमबीर सिंगही पुरावे देऊ शकले नाहीत, न्या.चांदीवाल यांचे स्पष्टीकरण 

💫 उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्नशील राज ठाकरेंचं वक्तव्य ; मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात', विधानसभेला स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार हे अगोदरच सांगितल्याचं स्पष्ट केले

💫 इंग्लिश न येताही मी राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवावं, बारामतीतूनच अजितदादा पवारांचा सणसणीत टोला ; बाकीच्यांचं वय बघता, बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन 

💫 शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ कुठंही वापरु नका, तुमच्या उमेदवारांना सूचना द्या, सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आदेश, इलेक्ट्रॉनिक नोटिफिकेशनही देण्याची सूचना 

💫 पालघरमध्ये दिलजमाई, विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर ओक्साबोक्सी रडणारे श्रीनिवास वनगा मुख्यमंत्री शिंदेंसोबत स्टेजवर, इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही, तुझं चांगलं होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा श्रीनिवास वनगांना शब्द ; पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतलं म्हणून टांगा पलटी झाला, पालघरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

💫 जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मुलींना मद्यधुंद गुंडांनी मारहाण केल्याचा खासदार रवींद्र वायकरांचा आरोप ; महिलांच्या पदराआड लपून लढण्यापेक्षा समोर या, जोगेश्वरीतील राड्यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांचे रवींद्र वायकरांना आव्हान 

💫 पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगेची तपासणी, बॅगेत फक्त कपडे आहेत, युरीन पॉट नाही, नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला ; बारामतीत अजित पवारांच्या हेलिकॉप्टरसह बॅगांची तपासणी, बॅगेत चकली, चिवडा, लाडू आणि गुलाबी कोट सापडले 

💫 टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू, केंद्रीय मंत्री अमित शाहांचं घाटकोपरमधील सभेत वक्तव्य ; महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार, महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार, जिंतूरच्या सभेत अमित शाहांचा विश्वास 

💫 संजय राऊतांच्या अंगात येऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातलं उतरलंच नसल्याने सरकार गेलं, कडेगावच्या सभेत विश्वजित कदमांची टीका                        

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या