🌟महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक पदावर संजय वर्मा यांची नियुक्ती.....!


🌟डीजीपी शुक्लांना पदावरून हटवल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्य पोलिस महासंचालक पदावर संजय वर्मा यांची केली नियुक्ती🌟 

✍️ मोहन चौकेकर 

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा  यांची राज्य पोलीस महासंचालक पदी डीजीपी पदी  ( Director General of Police of the state ) नियुक्ती करण्यात आली आहे.वरिष्ट आयपीएस संजय वर्मा यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांना हटविण्याची मागणी केली होती. नाना पटोलेंच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने माजी डीजीपी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले होते.

डीजीपी रश्मी शुक्ला यांना पदावरून दूर केल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे महाराष्ट्र केडरमधील तीन सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे मागवली होती, ज्यापैकी संजय वर्मा हे एक होते. या शर्यतीत अन्य दोन वरिष्ठ अधिकारी संजीव कुमार सिंघल आणि त्यांचे बॅचमेट रितेश कुमार यांचा सहभाग होता.डीजीपी हे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सर्वोच्च दर्जाचा आयपीएस अधिकारी असतात. पोलिस दलाचे प्रशासन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर असते.

IPS   आयपीएस संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. ते एप्रिल 2028 मध्ये सेवानिवृत्त पोलीस सेवेतून निवृत्त होतील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या डीजीपी पदासाठी ज्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती त्यामध्ये संजय वर्मा यांचे ज्येष्ठते नुसार आघाडीवर होते.

 संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे पोलिस महासंचालकपदी  नियुक्ती झाल्याबद्दल  बुलढाणा  शहरांमध्ये फटाके फोडण्यात आनंद साजरा करण्यात आला. संजय वर्मा हे बुलढाण्याचे माजी पोलीस अधीक्षक असुन संजय वर्मा 2002 ते 2004 या कालावधीत बुलढाणा जिल्हाचे पोलिस अधीक्षक होते. संजय वर्मा यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल बुलढाणा शहरांमध्ये अनेक  ठिकाणी फटाके 🎆 फोडून आनंद साजरा करण्यात आला आहे .

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या