🌟बोर्डाचे मा.अध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवी स.लड्डूसिंघ महाजन व माजी सदस्यांचे देखील अपक्ष उमेदवार कंदकुर्तेना समर्थन🌟
नांदेड (दि.१६ नोव्हेंबर २०२४) :- गोरगरीब,सर्वसामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारे व सर्वांच्या अडीअडचणीला धावून त्यांची कामे करणारे व हक्काचे सज्जन माणूस म्हणून परिचित असलेल्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार दिलीप व्यंकटराव कंदकुर्ते यांना आज शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी नांदेड शहरातील शीख समाज बांधवांनी एक बैठक घेऊन जाहीर समर्थन दिल यावेळेस दिलीप कंदकुर्ते यांना मोठ्या मतांनी निवडून आणण्याचा निर्धार देखील शीख समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आला.
यावेळी शीख समाज बांधवांच्यावतीने गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष लड्डूसिंघ महाजन यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या बाफना रोड येथील कार्यालयात आज शनिवारी शीख समाज बांधवांची बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वांनुमते दिलीप कंदकुर्ते यांना समर्थन देण्याचा ठराव घेण्यात आला या बैठकीत अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांचे शीख समाज बांधवांच्या वतीने भव्य स्वागत देखील करण्यात आले.
अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते हे अत्यंत प्रेमळ व सहनशीलतेने वागणारे नांदेड शहरातील लोकप्रिय नेते आहेत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची त्यांच्यात धमक आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची काळाची गरज आहे म्हणून आम्ही नांदेड दक्षिण मतदारसंघातील सर्व शीख समाज बांधवांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला असल्याचे यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक समाज भुषण स.लड्डसिंघ महाजन म्हणाले या बैठकीत दिलीप कंदकुर्ते यांनी मी शीख समाज बांधवांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध आहे. विशेष म्हणजे १९५६ ॲक्ट मधील कलम ११ रद्द करून गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्षपदी नांदेड शहरातील शीख समाजातील बांधव विराजमान करण्याचे काम करेल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी बोलतांना दिले दिलीप कंदकुर्ते यांच्या या आश्वासनाचे सर्व शीख समाज बांधवांनी स्वागत केले आहे.
मागील दोन विधानसभा निवडणूकीत दिलीप कंदकुर्ते हे पराभुत झाले विशेष म्हणजे ते या दोन्ही विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते या वेळेस मात्र असे होणार नाही आम्ही सर्वांनी त्यांना आमदार म्हणून निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे असा सुर या बैठकीत निघाला एक चांगले आदर्श व्यक्तिमत्व म्हणून अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांची नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ओळख असून त्यांच्या समर्थनात संपूर्ण मतदारसंघात ठिकठिकाणी सभा घेऊन त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे.
दिलीप कंदकुर्ते यांना जनतेतून मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यामुळे विरोधक कंदकुर्ते यांच्याबाबत अपप्रचार करीत आहेत. परंतु या अपप्रचाराला सर्व जनता प्रतिउत्तर देत असुन कंदकुर्ते यांचा अधिक जोमाने प्रचार करीत आहेत त्यामुळे विरोधकांचे सर्व मनसुबे उधळले आहेत. विशेष म्हणजे शीख समाज बांधवांच्या समर्थनामुळे कंदकुर्ते यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
या बैठकीस गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष स.लड्डूसिंघ महाजन, माजी सदस्य स.मनप्रीतसिंघ कुंजीवाले,स.जसपालसिंघ लांगरी,स.महेंद्रसिंघ लांगरी,स.रणजीतसिंघ गील,स.हरनामसिंघ मल्होत्रा,स.गुरमीतसिंघ महाजन,स.जगराजसिंग सिद्धु,स.सरजितसिंघ हॉटेलवाले,स.दर्शनसिंघ कोल्हापुरे,स.जगदीपसिंघ नंबरदार,स.गुणवंतसिंघ रागी,स.जसराजसिंघ बुंगई,स.राजवीरसिंग बुंगई,स.गुरुविंदरसिंघ रामगडिया,स.तिरतसिंघ खालसा,स.नरेंद्रसिंघ चंदन,स.गुरुमितसिंघ बेदी,स.ज्योतीसिंघ लोणीवाले,स.विजेंद्रसिंघ जयमलसिंघ,स.रवींद्रसिंघ पुजारी,स.दलबीरसिंघ मिलवाले,स.जीतसिंघ मोगलीवाले आदींची उपस्थिती होती.......
0 टिप्पण्या