🌟मुस्लीम आणि दलित समाजाच्या प्रतिनिधींकडून यादी न आल्याने आपण निवडणूक लढणार नाही - मनोज जरांगे पाटील
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकी संदर्भात मराठा आरक्षण आंदोलाचे धाडसी व बलशाली नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणारे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असतांना नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार असे समजले की मराठा आरक्षण आंदोलनाचे धाडसी नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी गावात महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी जोरदार चर्चासत्र सुरु होते परंतु परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे राज्यातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघातील जागांवर निवडूक लढण्याची तयारी मनोज जरांगे यांनी जाहीर केली होती यानंतर काल रविवार दि.०३ नोव्हेंबर २०२४ पासून ते १३ ते १४ जागांवर निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं स्वतः जाहीर केलं आहे सहकारी मुस्लीम आणि दलित समाजाच्या प्रतिनिधींकडून आपल्या उमेदवारांची यादी प्राप्त न आल्याने आपण निवडणूक लढणार नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मराठा समाज बांधवांशी आम्ही विधानसभा निवडणुकी संदर्भात बरीच चर्चा केली हि चर्चा जवळपास पहाटे ०३.०० वाजेपर्यंत चालली मित्रपक्षांच्या उमेदवारांची यादी येणार होती ती यादी काही आली नाही केवळ एकाच जातीच्या आधारावर निवडणूक लढणं शक्य नाही अजूनही मित्रपक्षांची यादी आलेली नाही नाईलाजाने आपण थांबलेलं बरं आता पाडापाडीच करावी लागेल आपण १३-१४ महिने राजकारण पाहतोय फक्त. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे आपले उमेदवारी अर्ज मागे घ्या ही सगळ्यांना विनंती करतो आहे आपली उगाच फसगत होईल. आपलं आंदोलन सुरुच आहे. निवडणूक झाली की आपण पुन्हा आपला मराठा आरक्षणाचा लढा देऊ एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. एका जातीवर जिंकता येणार नाही. मित्रपक्षांनी यादी पाठवलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार नाही असं मनोज जरांगेंनी जाहीर केली आहे.
पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले आम्ही मित्रपक्षांसह चर्चा करत होतो लढणार होतो. आमचे मतदारसंघही ठरले होते. आम्ही समाजाशी चर्चा केली. मित्र पक्षांनी यादी दिलेली नाही. मी तर कुणाला पाडही म्हणत नाही आणि निवडून आण हे पण हे सांगणार नाही. आता जर कुणी माझ्या आंदोलनात आलं तर मात्र मी कार्यक्रम करणार. मराठा समाज जर का एकटा लढला, तर निवडून येणार नाही. माझा समाज खूप वेदनेतून गेला आहे. मी एवढंच सांगेन की ज्याला कुणाला पाडायचं त्याला पाडा निवडून आणायचं त्यांना आणा. मात्र ज्याला निवडून आणायचं आहे त्यांच्याकडून लेखी घ्या. व्हिडीओही काढून घ्या. ” असंही आवाहन मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे......
0 टिप्पण्या