🌟अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे🌟
हिंगोली (दि.20 नोव्हेंबर 2024) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात सकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान सरासरी 6.46 टक्के मतदान झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदारसंघात 7.12 टक्के मतदान झाले असून, 93- कळमनुरी विधानसभा मतदारसंघात 5.78 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघात 6.48 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हावासीयांना केले आहे.
*हे आहेत हिंगोली जिल्ह्यातील 9 आदर्श मतदान केंद्र :-
1) महिला कर्मचारीद्वारे संचालित सखी (पिंक) आदर्श मतदान केंद्र
92-वसमत विधानसभा मतदार संघ :
मतदान केंद्र क्र. 190-बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगाव, पूर्व विंग रुम नं. 2
93-कळमनुरी विधानसभा मतदार संघ :
मतदान केंद्र क्र. 81-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन इमारत, कळमनुरी रुम नं. 2
94-हिंगोली विधानसभा मतदार संघ :
मतदान केंद्र क्र. 286-सिटी क्लब हिंगोली खोली क्र. 1
2) दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित आदर्श मतदान केंद्र
92-वसमत विधानसभा मतदार संघ : मतदान केंद्र क्र. 252-बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत खोली क्रमांक १
93-कळमनुरी विधानसभा मतदार संघ :
मतदान केंद्र क्र. 73-गुलाम नबी आझाद हायस्कूल कळमनुरी खोली क्र. 1
94-हिंगोली विधानसभा मतदार संघ : मतदान केंद्र क्र. 260-कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगोली
3) आदर्श युवा मतदान केंद्र
92-वसमत विधानसभा मतदार संघ :
मतदान केंद्र क्र. 267-जि. प. प्रशाळा वसमत, नवीन इमारत खोली क्रमांक- 3
93-कळमनुरी विधानसभा मतदार संघ :
मतदान केंद्र क्र. 183-ग्रामपंचायत, खोली क्र. 2 औंढा नागनाथ
94-हिंगोली विधानसभा मतदारसंघ: मतदान केंद्र क्र. 271-आदर्श महाविद्यालय, हिंगोली
******
0 टिप्पण्या