परभणी (दि.२० नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील परभणीसह जिंतूर पाथरी व गंगाखेड या चार विधानसभा मतदारसंघात आज झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण ७०.३८ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला परभणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिलेले माहितीनुसार जिंतूर मतदारसंघात ७३.२८ परभणी विधानसभा मतदारसंघात ६५.६१ गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ७२.०१ तर पाथरी विधानसभा मतदारसंघात ७०.०२ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्ह्यातील या चारही मतदारसंघात दुपारी ०३.०० वाजेनंतर मतदानाचा वेग वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु परभणीसह जिंतूर,पाथरी व गंगाखेड या चारही मतदारसंघात फारशा वेगाने मतदान झाले नाही सकाळपासूनच मतदान टप्प्या टप्प्याने व संथ गतीने सुरु होते दुपारनंतर मतदानाचा थोडाफार वेग वाढला त्याप्रमाणे मतदानात वाढ झाली .
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळी ०७.०० वाजता मतदानाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला तेव्हा सर्वसामान्य मतदारांनी त्या त्या भागातील केंद्रांवर सहकुटूंब हजेरी लावली. निवडणूक आयोगाने किंवा राजकीय पक्षांनी दिलेल्या पोल चिठ्ठीच्या आधारे मतदार यादीतील क्रमांक व बुथ क्रमांक शोधून काढले. पाठोपाठ मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रांवर प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे मतदान अधिकार्यांनी स्वागत केले. मतदान अधिकार्यांनी मतदार यादीतील मतदाराचा क्रमांक, छायाचित्राची, मतदारांकडील ओळखीच्या पुराव्याची खात्री केली. पाठोपाठ नोंद करीत, स्वाक्षरी घेवून बोटास शाई लावली. त्यानंतरच मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यास सुरुवात केली. सकाळी ०९.०० वाजेपर्यंत जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सर्वसाधारणपणे ०६.५९ तर ११.०० वाजेपर्यंत १८.६९ टक्के,दुपारी ०१.०० वाजेपर्यंत ३३.१२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता......
0 टिप्पण्या