🌟विधान परिषदेचे मा.आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाबाजानी दुर्राणी व सईद खान यांची बंडखोरी कायम🌟
परभणी (दि.04 नोव्हेंबर 2024) : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत म्हणजे आज सोमवार दि.04 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 47 उमेदवारांपैकी तब्बल 33 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले असून उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये माजी आमदार सौ.मिरा कल्याणराव रेंगे,दादासाहेब रामराव टेंगसे,नितीन रामराव लोहट,समीर गणेशराव दुधगावकर,डॉ.जगदीश शिंदे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता निवडणूकीच्या रिंगणात फक्त 14 उमेदवार शिल्लक राहिले आहेत यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सईद खान व माधवराव फड या तीघांची उमेदवारी कायम राहिली आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघात 53 उमेदवारांनी 77 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 47 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 33 उमेदवारांनी सोमवारी रिंगणातून माघार घेतली. त्यामध्ये गोविंद मदन घांडगे (अपक्ष), गयाबाई माधवराव फड (अपक्ष), अलीशेर महेबुब पाशा (अपक्ष), दादासाहेब रामराव टेंगसे (अपक्ष), रवींद्र विठलराव देशमुख (अपक्ष), किरण राधाकिसन शिंदे (अपक्ष), रंगनाथ मोहनराव सोळंके (अपक्ष), नितीन रामराव लोहट (अपक्ष), मंचक सागरराव बचाटे (अपक्ष), बालासाहेब तुकाराम पौळ (अपक्ष), मिरा कल्याणराव रेंगे (अपक्ष), समीर गणेशराव दुधगावकर(अपक्ष), सचिन सुरेश निसर्गध (बहुजन रि.सो.पार्टी), अरुण सीतारामजी कोल्हे (अपक्ष), सर्जेराव बाजीराव फंड (अपक्ष), संजय किशनराव कच्छवे (अपक्ष), मोइज अन्सारी अब्दुल कादर (अपक्ष), मुंजा ज्ञानदेव कोल्हे (अपक्ष), बापू रावसाहेब कोल्हे (अपक्ष), राम अचुतराव शिंदे (अपक्ष), जगदीश बालासाहेब शिंदे (अपक्ष), अर्जुन रामराव साबळे (अपक्ष), अभिजित अनंतराव कदम (अपक्ष), प्रल्हाद दत्तराव पाटील (अपक्ष), भास्कर रामकिसन बेदरे (अपक्ष), मोहन जनार्दन कुलकर्णी (अपक्ष), अतिश बापूराव गरड (अपक्ष), संतोष मुंजाभाऊ गवळी (अपक्ष), तुकाराम धोंडीबा रुमाले (अपक्ष), द्यानेश्वर अचुतराव काळे (अपक्ष), मो.फह्याजोद्दीन मो. नवाजोद्दीन अन्सारी (ओ.इ. म.ए.इ.) संदीप सोपान दातरे (अपक्ष) व शेख मुस्ताक शेख रज्जाक आदींचा समावेश आहे.
0 टिप्पण्या