🌟तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मानपत्रच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन - बालासाहेब जगतकर
परळी वैजनाथ :-- तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र परळीच्या वतीने २३फेब्रुवारी २०२५ रोजी बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहर व तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांना कळविण्यात येते की तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र परळीच्या वतीने दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रविवारी दुपारी ठीक साडेबारा वाजता परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बुद्ध विहार येथे बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बौद्ध समाजातील लोकांचा अनाठायी खर्च होणे व त्यासाठी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हे प्रकार टाळण्यासाठी व समाजातील ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा कुटुंबातील नववधू वरांना या सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेता यावा व सर्व समाजातील लोक एकत्र यावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून समाजातील जास्तीत जास्त नववधूवरांनी व त्यांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा व २३ जानेवारी २०२५ पर्यंत नाव नोंदणी करण्यात यावी असे ही आव्हान करण्यात आले असून नाव नोंदणीसाठी रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र दोन पासपोर्ट फोटो शंभर रुपयांच्या बॉण्ड वर शपथ पत्र टीसी ची झेरॉक्स असे कागदपत्र घेऊन नाव नोंदणी करावी असेही आवाहन करण्यात आले असून यापूर्वी सदरील विवाह हा 26 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता परंतु लोकसभेच्या निवडणुकीमुळे व निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे सदरील सामूहिक विवाह सोहळा रद्द करण्यात आला होता त्यामुळे हा विवाह २३ फेब्रुवारी२०२५ रोजी ठेवण्यात आलेला आहे. तरी जास्तीत जास्त बौद्ध धर्मियांनी याचा फायदा घ्यावा असेही आव्हान तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष साप्ताहिक मानपत्र चे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी केले आहे......
0 टिप्पण्या