🌟परभणी विधानसभा मतदारसंघातून 22 इच्छुक उमेदवारांची माघार....!


🌟परभणी विधानसभा मतदारसंघात आता एकून 15 उमेदवार निवडणूक रिंगणात🌟

परभणी (दि.04 नोव्हेंबर 2024) : परभणी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत म्हणजे आज सोमवार दि.04 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 37 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले असून त्यामुळे आता निवडणूकीच्या रिंगणात 15 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

                या मतदारसंघात एकूण 46 उमेदवारांनी 59 नामनिर्देशन दाखल केले होते त्यात 37 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 22 उमेदवारांनी सोमवारी रिंगणातून माघार घेतली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, डॉ. संप्रिया राहुल पाटील, किशार रणेर, डॉ. गोवर्धन खंडागळे, अलि खान मोईन खान, माजी महापौर सौ. अनिता सोनकांबळे, रवि सोनकांबळे, सय्यद नोमान हुसैन कौसर या प्रमुख उमेदवारांचा अर्ज माघारीच्या यादीत समावेश आहे.

                अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये किशनराव खरात (बहुजन समाज पार्टी),  डॉ. संप्रिया राहुल पाटील (अपक्ष), विजय आंबादासराव वरपुडकर (अपक्ष), विनोद ज्ञानेश्‍वरराव रसाळ (अपक्ष), मिर्झा जाकेर बेग (अपक्ष), किशोर सखाराम रनेर (अपक्ष), शेख रफीक अहमद (अपक्ष), अतिश बापूराव गरड (अपक्ष), सय्यद अतीक उर रहमान सय्यद अमीर (अपक्ष), माजी महापौर सौ. अनिता रविंद्र सोनकांबळे (अपक्ष), डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे (बहुजन भारत पार्टी), सुरेश लक्ष्मणराव बनसोडे (अपक्ष), बालाजी नामदेवराव मोहिते (अपक्ष), गजानन विश्‍वनाथ जोगदंड (अपक्ष), रमेश सदाशिव देशमुख (अपक्ष), सय्यद फारूक अली उर्फ बाबा (अपक्ष), त्रिंबक देविदास पवार (अपक्ष), अलि खान मोईन खान (अपक्ष), महेबुब खान साहब (अपक्ष), सय्यद नोमान हुसेन कौसर (अपक्ष), शेख सलीम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात निवडणूकीच्या रिंगणात 15 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या