🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्जासाठी 16 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ....!


🌟या योजनांतर्गत विद्यार्थ्यांना घरभाडे व इतर खर्च भागविण्यासाठी अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते🌟

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता 11 वी व त्यापुढील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही,अशा विद्यार्थ्यांना घरभाडे व इतर खर्च भागविण्यासाठी अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. 

सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षापासून ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 16 डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीने विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या