🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील 25 पैकी 13 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे 12 उमेदवार निवडणूक रिंगणात🌟
परभणी (दि.04 नोव्हेंबर 2024) :- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत आज सोमवार दि.04 नोव्हेंबर रोजी 25 पैकी एकूण 13 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकूण 25 इच्छुकांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते त्यापैकी 13 उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे रिंगणात आता 12 उमेदवार राहिले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये मदन रेंगडे पाटील,संजय साहेबराव कदम,स्मिता संजय कदम,जलील गुलाब पटेल,मुंजाजी नागोराव जोगदंड,प्रविण गोविंदराव शिंदे, बालासाहेब हरिभाऊ निरस,भगवान ज्ञानोबा सानप, लक्ष्मण शंकरराव शिंदे, विशाल बबनराव कदम, शिरीन बेगम मोहम्मद शफीक, शेख हबीब शेख रसूल,श्रीकांत दिगंबरराव भोसले अशा एकूण 13 जणांचा समावेश आहे.........
0 टिप्पण्या