🌟 महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली : भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बळकटी देणारे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते खा राहुल गांधी यांची तोफ चिखलीत १२ नोव्हेंबर रोजी धडाडणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा विधानसभा उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी दुपारी १२.०० वाजता शहरातील जाफ्राबाद रोडवरील मैदानात ही जाहीर सभा होणार असून या सभेला चिखली मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीचे चिखली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांनी केले आहे. १९७८ नंतर गांधी परिवारातील सदस्यांची पहिल्यांदा चिखली येथे सभा होणार असल्याने या सभेला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले हे विशेष.
याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, विधानसभा निरीक्षक संदीप मंगरोला, बुलढाणा जिल्हा प्रभारी दिनेश गुर्जर यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश एकडे, दिलीपकुमार सानंदा, सौ. स्वातीताई वाकेकर, डॉ. राजेंद्र शिंगणे, सिध्दार्ध खरात, जयश्रीताई शेळके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पत्रकार परिषदेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे चिखली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले की, लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर काँग्रेस पक्ष अँक्शन मोडवर आला खा. राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. भाजपच्या हुकुमशाही राजकारणाच्या विरोधात त्यांनी लोकशाही बचावाचा नारा दिल्याने त्यांच्या सभेला अलोट गर्दी उसळत आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारने विधानसभा निवडणूकीसाठी पंचसुत्री जाहीर केली असून यामध्ये राज्यातील महिलांना ३ हजार रुपये महिन्यासह एसटीचा प्रवासही मोफत असणार आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना महिन्याला ४ हजार रुपये, शेतकऱ्यांची ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, २५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा, आणि औषधे मोफत तसेच जातनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणामध्ये वाढ करण्यासाठी प्राधान्य देण्याचा समावेश असल्याने मविआची लाट निर्माण झाल्याचे आशादायी चित्र आहे. या सभेला चिखली विधानसभा मतदारसंघासह जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात मविआच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही जिल्हा काँग्रेस कमिटाचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे चिखली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले आहे.
* ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा : राहुल बोंद्रे
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस पक्षाची व्यापक भूमिका राहीली आहे. पुढे देशाच्या विकासासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी भरीव योगदान दिले. भारत देशातील लोक गांधी कुटुंबाचे बलिदान कधीच विसरणार नाही. त्याच गांधी कुटुंबातील काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी १२ नोव्हेंबर रोजी चिखलीत येत असल्याने या सभेला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. १९७८ नंतर गांधी परिवारातील सदस्यांची पहिल्यांदा चिखली येथे सभा होणार असल्याने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा, असे आवाहनही महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले आहे.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या