🌟परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात उद्या दि.12 नोव्हेंबर पासून 03 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद...!


🌟युवकांसाठी ‘कृषी अभियांत्रिकी शिक्षण’ या विषयावर 12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन🌟

परभणी (दि.11 नोव्हेंबर 2024) : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेक्स्ट जेन डिजिटल कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना’ या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनिअर्सचे 58 वे वार्षिक अधिवेशन आणि कृषी परिवर्तनाकरिता इच्छुक युवकांसाठी ‘कृषी अभियांत्रिकी शिक्षण’ या विषयावर 12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

               आंतरराष्ट्रीय परिसंवादाचा उद्घाटन समारंभ दीक्षांत सभागृहात होणार असून याप्रसंगी भास्तीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभुषण डॉ.आर.एस.परोडा, महासंचालक डॉ. हिमांशु पाठक, आयआयडी कानपुरचे संचालक पद्मश्री डॉ. मनींंद्र अग्रवाल, आयआयटी खरगपुरचे संचालक डॉ. व्ही. के. तिवारी, कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, पीडीकेव्ही अकोलाचे कुलगुरु डॉ.शरद गडाख, एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, बीएसकेकेव्हीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, उदयपुरचे माजी कुलगुरू डॉ. राठोड, अमेरिकेतील विद्यापीठाचे डॉ. किंग्स्ते, नेपाळमधील डॉ. भिमप्रसाद श्रेष्ठा, एशियन असोसिएशनचे डॉ. सय्यद इस्माईल, विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदींना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी कृषि व कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबाबत पद्मभुषण डॉ. आर. एस. परोडा यांना आयएसएई मानद फेलाशीप 2024 ने गौरविण्यात येणार आहे.

              या परिसंवादात ‘कृषी अभियांत्रिकीमधील नाविन्यपूर्ण उपाय आणि प्रगती’ यावर चर्चा करण्यासाठी देश-विदेशातील 500 पेक्षा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अधिकारी व शास्त्रज्ञ, देशातील विविध राज्यातील कृषि विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना उद्योगांचे प्रतिष्ठित प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि शास्त्रज्ञ, उद्योजक, विविध विभागातील मान्यवर, संजोयक विद्यार्थी, कृषि अभियंता सहभागी होणार आहे. अमेरिका, जर्मनी, जपान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया इत्यादी देशातून 700 पेक्षा जास्त संशोधन सारांश प्राप्त झाले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या