🌟होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अॅन्ड चॅरिटीज संस्थेचे डॉ.पवन चांडक व राजेंद्र खापरे यांचा कौतुकास्पद उपक्रम🌟
परभणी (दि.08 नोव्हेंबर 2024) : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अॅन्ड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे 10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान नागपूर-जगन्नाथपुरी या सायकलयात्रेचे आयोजन करण्यात आले असून परभणी येथील रहिवासी डॉ. पवन चांडक व राजेंद्र खापरे हे दोघे या यात्रेत सायकल प्रवास करणार आहेत.
या सायकल मोहिमेचा मार्ग नागपूर - देवरी - रायपूर - सरायपल्ली - सोनपूर - दासपल्ली मार्गे जगन्नाथ पुरी असा असणार आहे. नागपूर येथून 10 नोव्हेंबर रोजी सायकल प्रवासास सुरूवात करणार असून दररोज 130 ते 150 किमी प्रवास करून 15 किंवा 16 तारखेपर्यंत जगन्नाथपुरी येथे पोहोचणार आहेत.
मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे मुले एकलकोंडे बनत असून कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. आजी-आजोबा व नातवंडामध्ये गोष्टीतून होणारा संवाद व कौटुंबिक वाचन हरवत चालले आहे. घराघरात होणार्या कौटुंबिक वाचनाची जागा दुर्दैवाने मोबाईल व टीव्हीने घेतली आहे. यासाठीच कौटुंबिक वाचन व वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रसार व संवादाची गरज आहे. म्हणून एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, राजेंद्र खापरे यांनी या मोहिमेचे आयोजन केले आहे. ते या दरम्यान कोणत्याही हॉटेल, लॉजमध्ये मुक्काम न करता समविचारी मित्र, सामाजिक संस्था, मंदिरे, धर्मशाळांमध्ये मुक्काम करून शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत या सायकल प्रवास करणार आहेत......
0 टिप्पण्या