🌟उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत 93 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले🌟
परभणी (दि.04 नोव्हेंबर 2024) : परभणी जिल्ह्यातल्या परभणी,जिंतूर,पाथरी,गंगाखेड या 04 विधानसभा मतदारसंघात आज सोमवार दि.04 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत 93 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता जिल्ह्यातील या चार विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात 58 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
जिंतूरमधून 24 उमेदवारांचे अर्ज मागे घेतले, परभणीतून 22, गंगाखेडातून 13 तर पाथरीतून 33 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता जिंतूरातून 17, परभणीतून 15, गंगाखेडातून 12 व पाथरीतून 14 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
* जिंतूरात 17 उमेदवार रिंगणात :-
जिंतूर विधानसभा मतदारसंघातून 24 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत. प्रेक्षा विजय भांबळे (अपक्ष), कदम मुंजाजी साहेबराव (अपक्ष), अंकुश सिताराम राठोड (अपक्ष), प्रदिप उर्फ बाळासाहेब महादेव काजळे (अपक्ष), खंडेराव किसनराव आघाव (अपक्ष), डॉ. पुष्कराज प्रकाशराव देशमुख (अपक्ष), बालाजी माधवराव शिंदे (अपक्ष), भिसे राजेश भगवानराव (अपक्ष), विजय माणिकराव चव्हाण (अपक्ष), शरद सुदाम चव्हाण (अपक्ष), समीरराव गणेशराव दुधगावकर (अपक्ष), ज्ञानेश्वर देवीदास राठोड (अपक्ष), ज्ञानेश्वर नुरा राठोड (अपक्ष), अमृता सुरेशराव नागरे (अपक्ष), पांडुरंग भास्करराव कदम (अपक्ष), प्रसाद ज्ञानेश्वर काष्टे (अपक्ष), स्वाती बालासाहेब नखाते (अपक्ष), कृष्णा त्रिंबकराव पवार (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी), दिनकर धारोजी गायकवाड (राईट-टू-रिकॉल पार्टी), सुखदेव गोकुळ सोळुंके (अपक्ष), अमोल भिमराव सरकटे (अपक्ष), विष्णु दगडु ढोले (अपक्ष), अनिल सयाजी अंभुरे (अपक्ष), गणेश जगन्नाथ काजळे (अपक्ष).
* परभणीतील रिंगणात 15 उमेदवार रिंगणात :-
परभणी विधानसभा मतदारसंघातून आज 21 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. अर्ज माघारी घेतलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. विजय आंबादासराव वरपुडकर (अपक्ष), डॉ. संप्रिया राहुल पाटील (अपक्ष), मिर्झा जाकेर बेग (अपक्ष), अतिश बापूराव गरड (अपक्ष), विनोद ज्ञानेश्वरराव रसाळ (अपक्ष), शेख रफीक अहमद (अपक्ष), किशोर सखाराम रनेर (अपक्ष), सय्यद अतीक उर रहमान सय्यद अमीर (अपक्ष), डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे (बहुजन भारत पार्टी), अनिता रवींद्र सोनकांबळे (अपक्ष), रवींद्र गोविंदराव सोनकांबळे (अपक्ष), बनसोडे सुरेश लक्ष्मणराव (अपक्ष), बालाजी नामदेवराव मोहिते (अपक्ष), गजानन विश्वनाथ जोगदंड (अपक्ष), देशमुख रमेश सदाशिव (अपक्ष), सय्यद फारुख अली उर्फ बाबा (अपक्ष), त्रिंबक देविदास पवार (अपक्ष), अली खान मोईन खान (अपक्ष), महेमूद खान साहब (अपक्ष), सय्यद नौमान हुस्सैनी कौसर (अपक्ष), शेख सलीम शेख इब्राहिम (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्किलाब-ए-मिल्लत) तर 31 ऑक्टोबर 2024 रोजी अशोक किशनराव खरात यांनी अर्ज मागे घेतला होता.
* गंगाखेडात 12 उमेदवार रिंगणात :-
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून 13 उमेदवारांनी अर्ज घेतले. अर्ज माघार घेतलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. मदनजी रेनगडे पाटील (न्यु राष्ट्रीय समाज पार्टी), कदम संजय साहेबरराव (अपक्ष), कदम स्मिता संजय (अपक्ष), जलील गुलाब पटेल (अपक्ष), जोगदंड मुंजाजी नागोराव (अपक्ष), प्रविण गोविंदराव शिंदे (अपक्ष), बालासाहेब हरिभाऊ निरस (अपक्ष), भगवान ज्ञानोबा सानप (अपक्ष), लक्ष्मण शंकरराव शिंदे (अपक्ष), विशाल बबनराव कदम (अपक्ष), शिरीन बेगम मोहम्मद शफिक (अपक्ष), शेख हबीब शेख रसूल (अपक्ष), श्रीकांत दिगांबर भोसले (अपक्ष).
* पाथरीत 14 उमेदवार रिंगणात :-
पाथरी विधानसभा मतदारसंघातून 33 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. अर्ज माघारी घेतलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. गोविंद मदन घांडगे (अपक्ष), गयाबाई माधवराव फड (अपक्ष), अलीशेर महेबुब पाशा खुरेशी (अपेक्ष), टेंगसे दादासाहेब रामराव (अपक्ष), रविंद्र विठ्ठलराव देशमुख (अपक्ष), किरण राधाकिशन शिंदे (अपक्ष), रंगनाथ मोहनराव सोळंके (अपक्ष), नितिन रामराव लोहट (अपक्ष), मोईज अन्सारी अब्दुल खादर (अपक्ष), बचाटे मंचकराव सागरराव (अपक्ष), बालासाहेब तुकाराम पौळ (अपक्ष), मीरा कल्याणराव रेंगे (अपक्ष), समीरराव गणेशराव दुधगावकर (अपक्ष),सचिन सुरेश निसर्गंध (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), अरुण सितारामजी कोल्हे (अपक्ष), सर्जेराव बाजीराव फड (अपक्ष), संजय किशनराव कच्छवे (अपक्ष), मुंजा ज्ञानदेव कोल्हे (अपक्ष), बापू रावसाहेब कोल्हे (अपक्ष), राम उर्फ रामराव अच्युतराव शिंदे (अपक्ष), जगदिश बालासाहेब शिंदे (अपक्ष), अर्जुन पाटील भोगावकर (अपक्ष), अभिजित अनंतराव कदम (अपक्ष), प्रा. पी.डी. पाटील (अपक्ष), भास्कर रामकिशन बेंद्रे (अपक्ष), अतिश बापुराव गरड (अपक्ष), मोहन जनार्धन कुलकर्णी (अपक्ष), संतोष मुंजाभाऊ गवळी (अपक्ष), तुकाराम धोंडीबा रूमाले (अपक्ष), ज्ञानेश्वर अच्युतराव काळे (अपक्ष), मो. फयाजोद्दीन अन्सारी मो. नवाजोद्दीन अन्सारी (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लते), संदिप सोपान दातरे (अपक्ष), मुश्ताक रज्जाक शेख (अपक्ष).
0 टिप्पण्या