🌟अध्यक्षपदी मो.जमील मो.बाबुमिया तर उपाध्यक्ष पदावर शेख बद्दरोदिन शेख पाशा यांची बिनविरोध निवड🌟
पुर्णा (दि.१२ आक्टोंबर २०२४) :- पुर्णा शहरातील मस्तानपुरा परिसरात असलेल्या जिल्हा परिषद केंद्रिय कन्या शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी मो.जमील मो.बाबुमिया तर उपाध्यक्ष पदावर शेख बद्दरोदिन शेख पाशा यांची निवड करण्यात आली.
पूर्णा शहरातील मस्तानपुरा परिसरातील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय कन्या शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीची दोन वर्षाची मुद्दत संपल्याने दिनांक 11 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी 10 30 वाजता पालक सभा घेण्यात आली या मध्ये शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षपदी मो.जमिल मो.बाबुमिया तर उपाध्यक्षपदी शेख बद्दरोदिन शेख पाशा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे समिती सचिव तथा मुख्याध्यापक श्रीमती व्ही सी साने यांनी अभिनंदन केले.याप्रसंगी शिक्षिका श्रीमती पुष्पलता दासरवार मॅडम,श्रीमती शारदा राक मॅडम,श्रीमती संगीता बोगळे मॅडम,पत्रकार श्री केदार पाथरकर,सामाजिक कार्यक्रते असद,बी.जी.काशिदे सर व पालक उपस्थित होते.
0 टिप्पण्या