🌟सरकारनं कंत्राटदारांची ४० हजार कोटींची बिलं थकवल्याचा आरोप,थकित बिलांसाठी कंत्राटदारांची आंदोलनाची हाक🌟
✍️ मोहन चौकेकर
💫 हरयाणा व जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी हे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी महाराष्ट्रातील निवडणुका घोषित होणार
💫 बहुप्रतीक्षित भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल, आरे रोड ते बीकेसीपर्यंतचा गारेगार प्रवास अवघ्या २२ मिनिटांत होणार
💫 सरकारनं कंत्राटदारांची ४० हजार कोटींची बिलं थकवल्याचा आरोप,थकित बिलांसाठी कंत्राटदारांची उद्या आंदोलनाची हाक, तर विरोधकांचं लाडकी बहीण योजनेवर बोट
💫 दिल्लीत एकनाथ शिंदेंची अमित शाहांसोबत १५ मिनिटं खलबतं, जागावाटपाच्या सूत्रावर प्राथमिक चर्चा, अंतिम निर्णय मुंबईत होणार
💫 लोकसभेत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा कुटुंबासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ; इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हाती घ्यावं, जयंत पाटलांनी जाहीर केली इंदापूरमधून अप्रत्यक्ष उमेदवारी ; ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
💫 शरद पवार अजित पवारांना आणखी एक धक्का देणार, रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाचे खुद्द शरद पवारांकडूनच संकेत, 14 तारखेला शरद पवारांचा फलटण दौरा
💫 पहिली अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास भाजपची तयारी होती, पण राऊतांनी खोडा घातला, शिवसेना नेते संजय शिरसाटांचा मोठा दावा
💫 धनगर आरक्षणामधला मोठा अडथळा दूर, 'धनगड' जातीचे 6 दाखले सरकारकडून रद्द, महाराष्ट्रात धनगड ही जातच नाही, धनगर नेत्यांच्या दाव्यावर सरकारची मोहोर
💫 जाळीवर उडी मारणाऱ्यांना कोणी सर्कस म्हणो किंवा तमाशा म्हणो, पण माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला, नरहळी झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार ;शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही, नरहरी झिरवाळांनी सांगितलं राजकारण
💫 मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन, नितीन गडकरींनी सांगितला मेळघाटातील वनखात्याच्या अधिकाऱ्यांना धमकवल्याचा जुना किस्सा
💫 इनकमिंग सुरु झालं पण उद्धव ठाकरेंनी अटी सांगितल्या, एकनाथ शिंदेंची साथ देणाऱ्या आमदारांना नो एंट्री
💫 देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारणार, 100 कोटी रुपयांची तरतूद करणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती
💫 चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, आग विझवण्याच्या नावाखाली गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
💫 अभिनेत्री सुहास जोशी यांचा नाट्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्काराने होणार गौरव, यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर
💫 व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांची वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलवर मोहोर, microRNA च्या शोधाचा गौरव
💫 पुण्यात विद्यमान भाजप आमदारांसमोर पक्षातील माजी नगरसेवकांचं आव्हान.. तिकीट जाहीर होण्याआधीच इच्छुकांकडून प्रचाराचा श्रीगणेशा..
💫 जालन्यात काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर..इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा
✍️मोहन चौकेकर
0 टिप्पण्या