🌟ओडिशात 'दाना' चक्रीवादळात गुड न्यूज : १६०० महिलांनी दिला बाळांना जन्म.....!


🌟चक्रीवादळ आश्रयस्थानात नेण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांमध्ये या मातेचा देखील समावेश🌟 

✍️ मोहन चौकेकर 

ओडिशामध्ये (Odisha) दाना चक्रीवादळाने तीन लाख लोकांना सुरक्षित स्‍थळी हलवण्यात आले आहे. या वादळाचा तीन राज्‍यांवर परिणाम झाला आहे. मात्र विमानसेवा पूर्ववत होत असल्‍याचे समोर आले आहे. गुरूवारी मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले की, दाना चक्रीवादळामुळे आरोग्य केंद्रात हलवण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांपैकी 1,600 महिलांनी बाळांना जन्म दिला. त्‍यांनी सांगितले की, एकुण 5,84,888 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. ही संख्या आणखीन वाढू शकते. माझी म्‍हणाले, हे लोक 6,008 चक्रीवादळ आश्रयस्थानांमध्ये राहत आहेत, जिथे त्यांना अन्न, औषध, पाणी आणि इतर आवश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बालासोर जिल्ह्यातून सर्वाधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले, जिथे 172,916 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, त्यानंतर मयूरभंज येथे 100,000 लोकांना हलवण्यात आले. याशिवाय भद्रकमधून 75 हजार, जाजपूरमधून 58 हजार आणि केंद्रपारा येथून 46 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. त्यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारने सुरुवातीला 10 लाख लोकांना स्थलांतरित करण्याचे लक्ष्य ठेवले होते आणि चक्रीवादळ दानाच्या बदलत्या मार्गावर आधारित लक्ष्य समायोजित केले गेले.

माझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना 'दाना' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तयारीची माहिती दिली. ओडिशा सरकारने उचललेल्या पावलांवर केंद्र समाधानी असल्‍याचे माझी यांनी सांगितले. आदल्या दिवशी, कटक जिल्ह्यातून बाहेर काढलेल्या एका महिलेने नियाली रुग्णालयात मुलाला जन्म दिला. राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क (I&PR) विभागाने या जन्माची घोषणा केली होती, ज्यात म्हंटले आहे की, चक्रीवादळ आश्रयस्थानात नेण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांमध्ये या मातेचा देखील समावेश होता....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या