🌟छत्रपती संभाजी नगर येथील बुद्ध लेणी परिसरात इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या वतीने अल्पोपहार वाटप🌟
छत्रपती संभाजी नगर - 2568 अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त छ.संभाजी नगर (औरंगाबाद) येथील बुद्ध लेणी परिसरामध्ये इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन 'इरा'च्या वतीने शनिवार दि.12 ऑक्टोबर 2024 रोजी अल्पोपहार वाटप करण्यात आले.
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवीदिल्ली 'इरा ' चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मदन (बापु ) कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली मराठवाडा विभागातील टीम कार्यरत आहे, मराठवाडा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रविण खरात यांनी सामाजिक बांधिलकी पत्करून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते , जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या छ. संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथील बुद्ध लेणी परिसरात , विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखो अनुयायी जमा होत असतात , त्यांच्या नाश्ता, फराळाची सोय व्हावी म्हणून 'इरा' परिवाराचे वतीने कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रविण खरात (संपादक, प्रचेत मेल) यांनी , त्यांच्या टीम च्या सहकार्याने, पुलाव वाटपाची व्यवस्था केली होती.
महावितरण पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक भुजंग खंदारे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध दंतशल्य चिकित्सक डॉ. ज्योती खंदारे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ उपासक शामराव खरात, राधाबाई खरात ,गंगासागर कोलते सचिन खरात ,बी.एस.एन.शिरसाट बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर सीरसाठ ,सचिव वैशाली सीरसाठ ,युनियन बँकेचे व्यवस्थापक शुध्दोधन कोलते, युवा उद्योजग तथा अश्वस्त ब्रँडचे मालक अभियंता लौकिक खंदारे, सचिन खरात, ॲड. कपिल शिंदे, प्रशिक् सिरसाठ, प्रणव खंदारे, अंशुल तलवाणी, अक्षय तेलतुंबडे, आदित्य भीमसानी, अनिल खंदारे, प्रचेत खरात, सतीश खंदारे, नीता मस्के, कल्पना जाधव, प्रदीप सदाफुले ,आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभली होती .या उपक्रमाचा हजारो अनुयायांनी लाभ घेतला आहे. इरा चे महाराष्ट्र मीडिया प्रमुख देवानंद वाकळे तसेच इरा च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाबद्दल कौतुक करुन अभिनंदन केले आहे.......
0 टिप्पण्या