🌟पुर्णेतील रेल्वे उड्डाण पुल बांधकाम गुत्तेदाराकडून होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामाला रेल्वे कॉलेटी कंट्रोल विभागाची संमती ?


🌟निकृष्ट बांधकाम लपविण्यासाठी अर्धवट उड्डाण पुलाला तात्काळ रंगरंगोटीसह तडकलेल्या दर्जाहीन बांधकावरही सिमेंट प्लास्टर🌟


पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील हिंगोली रेल्वे गेट परिसरात मागील पाच वर्षांपूर्वी रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामाला महारेल (एमआयआरडीसी) अंतर्गत दि.२७ ऑगस्ट २०१९ रोजी सुरुवात झाली सदरील रेल्वे उड्डाणपूलाचे दर्जाहीन बांधकाम पाच वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देखील आतापर्यंत पुर्ण झालेले नसून कासवगतीने सुरू असलेल्या या उड्डाण पुलाच्या बांधकामाचे ९६ कोटी ६६ लाख ३५ हजार ७५७ रुपयांचे टेंडर प्रथमतः एम/एस डिसीएस - पि.व्ही.राव (जेव्ही) यांना देण्यात आले होते परंतु सदरील बांधकाम गुत्तेदार महोदयांनी अर्धवट काम असतांनाच या उड्डाण पुलाच्या बांधकामाचे सब गुत्तेदार गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा ली हैदराबाद या कंपनीच्या स्वाधीन केले यानंतर पुन्हा तिसऱ्या वेळी महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन ली या कंपनीला रेल्वे उड्डाणपूल बांधकामाचे टेंडर बहाल करण्यात आले अशा प्रकारे तीन गुत्तेदार बदलल्यानंतर देखील रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम पुर्ण तर झालेच नाही उलट कामाचा दर्जाही घसरला आणि संबंधित रेल्वे उड्डाणपूल बांधकाम कंपन्यांनी स्थानिक महसूल प्रशासनातील भ्रष्ट नौकरशहांसह गौण खनिज वाळू तस्कर/माफियांनी हातमिळवणी करीत रेल्वे उड्डाणपूल बांधकामासाठी कोट्यावधी रुपयांचा अवैध चोरटा वाळुसाठा अल्पशा दरात खरेदी करुन 'आम तो आम गुठलीयो के दाम' या पध्दतीचा अवलंब करीत असतांना संबंधित गुत्तेदार कंपनीने आपल्या पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील दुरसंचार विभागाच्या कार्यालयासमोरील मिक्सर प्लॉन्टवर जवळपास १४०० ते १५०० ब्रास अवैध चोरट्या वाळूचा साठा करून ठेवला असल्याची गंभीर बाब एक सर्वसामान्य जागृक नागरिक म्हणून दि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी लेखी तक्रार अर्जाद्वारे तहसिलदार माधवराव बोथीकर यांना आम्ही निदर्शनास आणून दिले परंतु सदरील तक्रार अर्जाची तहसिलदार बोथीकर यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही यानंतर आम्ही तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या अकार्यक्षम कारभारा विरोधात परखड लिखाण केल्यानंतर त्यांनी दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रसारमाध्यमांच्या डोळ्यात धुळ झोपण्यासाठी संबंधित रेल्वे उड्डाणपूल बांधकाम गुत्तेदार कंपनीशी हितसंबंध जोपासत थातुरमातुर कारवाई नाट्य रंगवत केवळ ४५० ब्रास अवैध चोरट्या वाळूचा साठा जप्ती नाट्य रंगवले तहसिलदार बोथीकर यांनी तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर तब्बल ५२ दिवसांनी केलेली कारवाई संबंधित रेल्वे उड्डाणपूल बांधकाम गुत्तेदार कंपनी महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन ली घ्या हिताची ठरली व संबंधित कंपनीने ५२ दिवसांच्या कालावधीत आपल्या मिक्सर प्लॉन्टवरील जवळपास अर्ध्या अवैध चोरट्या वाळू साठ्याची विल्हेवाट लावली यानंतर देखील या मिक्सर प्लॉन्टवर तहसिलदार बोथीकर यांच्या कारवाई वेळी जवळपास सात आठशें ब्रास अवैध चोरटा वाळूसाठा असतांना देखील तहसिलदार बोथीकर यांनी केवळ ४५० ब्रासच अवैध चोरटा वाळूसाठा दाखवून व या वाळूसाठ्याचा पंचणामा स्वतःच्या उपस्थितीत तात्काळ करण्याऐवजी तलाठी तलाठी सज्जा बरबडी तालुका पुर्णा यांच्या मार्फत दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी करीत अक्कलेचे तारे तोडले याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे तहसिलदार बोथीकर यांनी संबंधित रेल्वे उड्डाणपूल बांधकाम गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा ली व महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन ली या कंपनीवर कायदेशीर कारवाई करीत कंपनीवर जवळपास दहापट दंडात्मक कारवाई करण्याऐवजी या कंपन्यांशी हितसंबंध जोपासत कंपनी कडून घाईगडबडीत दि.०१  आक्टोंबर २०२४ रोजी महाराष्ट्र गव्हर्नमेंट गौरमेंटच्या नावाने ०३ लाख ४६ हजार ५००/- रुपयांचा एचडीएफसी बॅंकेचा डिमांड ड्राफ्ट भरुन घेण्याचा अजब गजब कारभार केला तो डिमांड ड्राफ्ट देखील महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ट्रेझरी मध्ये जमा झाला नसल्याचे समजते.


पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील हिंगोली गेट परिसरात मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपूल बांधकामामुळे परिसरातील जनजीवन देखील विस्कळीत झाले असून या रेल्वे उड्डाणपूलाच्या आसपासचे पर्यायी मार्ग सर्वसामान्य जनतेसह वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत असून या रेल्वे उड्डाणपूलाचे निकृष्ट व दर्जाहीन बांधकाम भविष्यात तमाम पुर्णेकरांसह या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारक/वाहनचालकांसाठी देखील भयंकर धोकादायक ठरणार असल्याने भारतीय रेल्वे प्रशासनाने या रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामाच्या बांधकामाची बांधकाम तज्ञांच्या उपस्थित कॉलेटी कंट्रोल मार्फत सखोल चौकशी करून संबंधिता गुत्तेदार कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या