🌟श्री रेणुका देवी मंदिरात तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली : चिखलीचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या श्री रेणुका देवी संस्थान व बचानंद स्वामी संस्थान मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदा 3 ऑक्टोंबर पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमास धार्मिक वातावरणात व उत्साहात सुरुवात झाली आहे.
श्री रेणुका देवी मंदिरात तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात झाली श्री रेणुका देवी मंदिरात या नवरात्र उत्सव दरम्यान दररोज भजन, पूजन ,कीर्तन, प्रवचन, हरिपाठ , ज्ञानेश्वरी, पारायण ,भारुड , गोंधळ, गरबा, गीते , तुळसी रामायण सुंदरकांड यासोबतच दररोज सायंकाळी चार ते सहा पर्यंत महिला मंडळाचे भजन रात्री दहा नंतर देवीच्या जागर तसेच दररोज सकाळी व सायंकाळी सात वाजता देवीची आरती करण्यात येत आहे . सकाळी आठ ते दहा पर्यंत ह. भ.प. शालीकराम भुसारी यांच्या नेतृत्वाची श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी तीन ते पाच पर्यंत वेदशास्त्र अभ्यासक सखारामपंत सराफ यांच्या वाणीतुन श्री देवी भागवत कथेचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. रात्री आठ वाजता गरबा आणि भजन कार्यक्रम होत आहेत . उद्या रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ गुरु मंदिराच्या वतीने स्वर्गीय दिपकभाऊ गुळवे समर्पित सेवा श्री दुर्गासप्तशतीचा सामुहिक पाठ घेण्यात येणार आहे .बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता लक्ष्मण गाताडे पिंपळवाडी यांच्या षष्ठीचा गोंधळ होणार आहे .शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता होमहवन आणि महानवमीचा उपवास नवरात्रौत्थापन होईल. शनिवार दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी कावड यात्रा मित्रमंडळाचे वतीने गंगाजल अभिषेक व विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्र पूजनाचा कार्यक्रम होणार असून. सायंकाळी दसरा उत्सवात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाचा समारोप मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महाप्रसाद वितरणाने होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ संपूर्ण चिखली तालुक्यातील भावीक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री रेणुका संस्थान व बचानंद महाराज संस्थांनचे अध्यक्ष राजाभाऊ खरात , उपाध्यक्ष गोपाल शेटे, सचिव वसंत शेटे आणि विश्वस्त सचिन बोंद्रे , पंडितराव देशमुख, विजय खरात यांनी केले आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या