🌟तर उपाध्यक्षपदी इंद्रजीत आवरगंड यांची सर्वानुमते निवड🌟
पुर्णा (दि.१० आक्टोंबर २०२४) :- पुर्णा तालुक्यातील माखणी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन कार्यकारणी निवडीसाठी पालकांची सभा दिनांक 0९.रोजी येथील जि.प.प्रा शाळेत शिवाजी आवरगंड यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी विष्णू नरहरी आवरगंड तर उपाध्यक्षपदी इंग्रजीत.आवरगंड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून शिवाजीराव आवरगंड, धोंडिराम पल्लमपल्ली, प्रल्हाद आवरगंड, संदिप आवरगंड, बालजी भुजबळ, सिता आवरगंड, संध्या आवरगंड, उर्मिला आवरगंड, सोनाली आवरगंड, भिमराव वाघमारे, कमलाबाई आंबोरे, , भाग्यश्री पल्लमपल्ली यांची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीचे सरपंच गोविंदराव आवरगंड, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष मंचकराव आवरगंड, बापूराव पल्लमपल्ली, सचिन आवरगंड , शिवाजी आवरगंड, प्रगतशील शेतकरी जनार्धन आवरगंड चादाजी आवरगंड अनुरथ आवरगंड विष्णु आवरगंड गणेश सोळके मोतीराम आवरगंड बंडु गाडे आदीसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले पालक सभा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सौ. व्हि.व्हि.वैद्य व सहशिक्षक यांनी पुढाकार घेतला.....
0 टिप्पण्या