🌟जिल्हाधिकारी गावडे यांची ग्वाही : राजकीय पक्षांना इशारा🌟
परभणी (दि.१६ आक्टोंबर २०२४) :- परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावनी केली जाणार असल्याची माहिती परभणीचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज बुधवार दि.१६ आक्टोंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.
निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केल्यापासून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावनीस सुरुवात झाली आहे त्याप्रमाणेच त्या त्या ठिकाणी मुख्य चौक,मुख्य रस्त्यांवरील छोटे मोठे होर्डीग्ज, झेंडे व अन्य काही साहित्य हटविण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावनी करीता तसेच उमेदवारांच्या खर्चांवर देखरेख ठेवण्याकरीता विविध पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.त्यात प्रत्येक विधानसभा स्तरावर एक लेखापथक,१४ फिरते पथक,२० स्थिर सर्वेक्षण पथक,१६ व्हिडीओ चित्रीकरण पथक,०६ व्हिडीओ पाहणी पथक स्थापन करण्यात आले आहेत. निवडणूकीत उमेदवारांनी करावयाच्या कमाल खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये असणार आहे. उमेदवारांनी करावयाच्या खर्चामधील बाबींचे दरही निश्चित करण्यात आले असून राजकीय पक्षांच्या बैठकीमध्ये त्यांना ते दर, सूची पुरविण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी गावडे यांनी नमूद केले.
जिल्हास्तरीय माध्यम प्राधिकरण व सनियंत्रण समितीमार्फत जाहिरात प्रसिध्दीपूर्व प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मिडीया सेंटर या ठिकाणीही संबंधित उमेदवारांना आपले अर्ज दाखल करणे अनिवार्य करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले......
0 टिप्पण्या