🌟महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या......!


🌟आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या,आम्ही पाठिंबा देऊ शरद पवारांचे मोठे वक्तव्य🌟

✍️ मोहन चौकेकर

💫 राजकारणातील कॅश कास्ट आणि क्रिमिनल शुद्धीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्त्वाच्या अनुकरण गरजेचे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी                           

💫 रामकृष्ण हरी वाजवा तुतारी! माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची इंदापुरात मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश ; हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत करतो, अशा पध्दतीचे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील, शरद पवारांची प्रतिक्रिया ;  मला तिकीट मिळणार आहे का नाही? हे मला देखील माहित नाही, हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयानंतर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया 

💫 विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, धनगर आणि धनगर एकच असल्याच्या राज्य सरकारच्या जीआरवर घेतला आक्षेप ;  'मी आधी आदिवासी नंतर विधानसभा उपाध्यक्ष', मंत्रालयाच्या जाळीवर उडी घेतल्यानंतर नरहरी झिरवाळ भावनिक, अश्रू अनावर 

💫 उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का, माढ्याचे विद्यमान आमदार साथ सोडणार, बबनदादा शिंदे म्हणाले, शरद पवारांनी मुलाला उमेदवारी दिली तर तुतारी घेणार, नाहीतर अपक्ष उभा करु ; हाच का 30 वर्षांतला विकास? माढ्यात बॅनर झळकले, आमदार बबन शिंदे यांच्याविरोधात पोस्टरबाजी  

💫 विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास केंद्रीय  मंत्रिमंडळात मंजुरी ; राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास, मंत्रिमंडळ बैठकतील 33 मोठे निर्णय 

💫 आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या,आम्ही पाठिंबा देऊ, शरद पवारांचे मोठे वक्तव्य ; लाडकी बहीण योजना आणली पण तेवढ्यावर भागत नाही, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकारनं पाऊल उचलले पाहिजे, शरद पवारांची राज्य सरकारवर टीका 

💫 महाविकास आघाडीत एका-एका जागेसाठी रस्सीखेच; MIM ला हव्यात 28 जागा; काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युती करण्याच्या पहिलेच दिला प्रस्ताव; भाजपपाठोपाठ काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर! अहमनगरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरु असतानाच जोरदार राडा 

💫 पुण्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण करून सामूहिक अत्याचार, संतापजनक घटना ;  मुली कुठे सुरक्षित? दोन दिवसात पुण्यात तीन लैंगिक अत्याचाराच्या घटना! शाळेत, घरात अन् बाहेर फिरायल्या गेलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार 

💫 अक्षय शिंदे अत्याचार प्रकरणातील बदलापुरातील शाळेच्या ट्रस्टींची सुटका ; न्यायालयाकडून दोघांनाही जामीन मंजूर 

💫 अभिनेता गोविंदाला चार दिवसांनी रुग्णालयातून डीस्चार्ज, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? अभिनेत्याने स्वत: सगळं सांगितलं 

💫 ठाणे पूर्वमध्ये कोपरीतील तरुणाची हत्या; धारदार शस्त्रांनी हत्या करून तरुण अन् तरुणी पोलिसांना शरण ;  मुलीच्या आई-वडिलांकडून लग्नास नकार मिळाल्याने बीडच्या नेकनूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या                                            

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या