🌟छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ🌟
✍️ मोहन चौकेकर
संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीनं उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर नेतेमंडळी जोरदार शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल करत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजी नगर मध्यचे उमेदवार किशनचंद तनवानी यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. किशनचंद तनवानी यांनी पत्रकारांशी बोलताना उमेदवारी मागे घेण्याचं कारण सांगितलं आहे.
* किशनचंद तनवानी काय म्हणाले ? :-
पक्षप्रमुखांनी (उद्धव ठाकरे) मला उमेदवारी दिली होती. ती उमेदवारी मी मागे घेतली आहे. 2014 ची परिस्थिती होऊ नये, हिंदुत्व मतांमध्ये फुट पडुन नये व एमआयएम विजय होऊ नये यासाठी मी लढणार नाही, अशी विनंती उद्धव ठाकरे यांना केली. 2014 ला हीच परिस्थिती झाली होती. 2019 ला हीच परिस्थिती होणार होती. प्रदीप जैस्वालची तब्येत ठीक नसतानाही मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे.
भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याध्यक्ष असताना मी लढलो नाही. त्यांना पाठिंबा देऊन निवडून आणलं आहे. 2024 ला प्रदिप जैस्वाल मला पाठिंबा देतील असे ठरले होते आता त्यांनी पक्ष बदलला आणि एकनाथ शिंदे गटात त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मी प्रदिप जैस्वाल यांना मला पाठिंबा देण्याची विनंती केली परंतु ती त्यांनी मान्य केली नाही. त्यामुळे 2014 ची परिस्थिती होऊ नये, हिंदुत्व मतांमध्ये फुट पडुन एमआयएम विजयी होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे व उद्धव ठाकरे जो उमेदवारी देतील त्यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने संभाजीनगर मध्य या मतदारसंघासाठी पहिल्या यादीत किशनचंद तनवाणी यांचे नाव घोषित केलं होते. परंतु, किशनचंद तनवानी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान किशनचंद तनवाणी यांना जिल्हा प्रमुख पदावरुन पदमुक्त करण्यात आल्याचे व त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात आले असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितले. किशनचंद तनवाणी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ही चर्चा कितपत खरी आहे की नाही हे लवकरच कळेल......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या