🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार विशाल कदम यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी ते म्हणाले🌟
परभणी (दि.२८ आक्टोंबर २०२४) : ‘आमचा उमेदवार गेल्या निवडणूकीत हारला असला तरी’ या निवडणूकीत त्या पराभवाचे निश्चितपणे उपटे काढू असा मला विश्वास आहे असे उद्गार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी काढले डॉ रत्नाकर गुट्टे यांनी आमच्या नादाला लागू नये, आम्ही मोकळं केल्याशिवाय सोडत नाही ते त्यांनी लक्षात ठेवावे, असा गर्भगळीत इशारा सुध्दा यावेळी त्यांनी दिला.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांनी आज सोमवार दि.२८ आक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार संजय जाधव,खासदार श्रीमती फौजिया खान,माजी आमदार विजय गव्हाणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत खासदार जाधव यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर जोरदार टिका टिप्पणी केली.
गेल्या निवडणूकीत आमचा उमेदवार पराभूत झाला. परंतु, त्या पराभवाचे उट्टे निश्चितच या निवडणूकीत काढू, असा विश्वास व्यक्त केला. माय-बाप जनतेस माझी हात जोडून विनंती आहे, ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, असे स्पष्ट करतेवेळी खासदार जाधव यांनी प्रत्येक ठिकाणी पैशाच्या जोरावर आणि दादागिरीवर किती जणांना तुम्ही तोलणार आहात, असा सवाल गुट्टे यांना करीत आम्ही मेलेल्या आईचे दूध पिलेलो नाहीत, आरे ला कारे म्हणण्याची ताकद आमच्यातसुध्दा आहे. ही परभणी आहे, परळी नाही हे लक्षात ठेवा गुट्टे, ही परभणी म्हणजे जगात जर्मनी आणि भारतात परभणी आहे, आमच्या नादाला लागल्यावर आम्ही मोकळं केल्याशिवाय सोडत नाही, हे लक्षात ठेवा, आज इशारा देतोय, असे नमूद करीत खासदार जाधव यांनी आणखी घोडा मैदान बाकी आहे, असा इशाराही खासदार जाधव यांनी दिला.......
0 टिप्पण्या