🌟शिवसेना (उबाठा) गटाकडून डॉ.पाटील उद्या २९ आक्टोंबर रोजी शक्ती प्रदर्शनाद्वारे करणार उमेदवारी अर्ज दाखल🌟
परभणी (दि.२८ आक्टोंबर २०२४) : परभणी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमार्फत मंगळवार दि.२९ आक्टोंबर २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील हे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत या शक्तीप्रदर्शनात शिवसेना (उबाठा) गटाच्या युवा आघाडीचे आदित्य ठाकरे यांची उपस्थिती लक्षणीय असणार आहे.
मंगळवारी सकाळी १०.०० वाजता शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आमदार पाटील यांच्याद्वारे रॅली काढली जाणार असून यावेळी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त खासदार संजय जाधव, आमदार डॉ. पाटील, खासदार श्रीमती फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार विजय गव्हाणे यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. रॅलीच्या समारोपाप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालया लगतच्या मैदानावर ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीची ताकद दाखवून देण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक वर्ग, महिला मतदार यांच्यासह विविध आघाड्यांच्या प्रमुख पदाधिकार्यांनी यामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खा. संजय जाधव, खा. फौजीया खान, आ. सुरेश वरपूडकर, विजय गव्हाणे यांच्यासह महा विकास आघाडीतील जिल्हाध्यक्ष, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी प्रमुख आघाड्यांचे पदाधिकारी यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या