🌟मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथील चेतन येवले भारत उद्योग गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित......!


🌟प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते वेंडिंग फोटोग्राफर म्हणून भारत उद्योग गौरव सन्मान🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथील अल्पभुधारक शेतकऱ्यांचे पुत्र, युवा उद्योजक चेतन पंजाब येवले यांना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते वेंडिंग फोटोग्राफर म्हणून भारत उद्योग गौरव सन्मान पुरस्कार 2024 पुणे येथे देऊन सन्मानित करण्यात आले.

               ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षण घेतल्यानंतर नोकरी लागेल की न लागेल या दुधा मनस्थितीत तरुण असतात परंतु यापैकीच काही तरुण आपल्या कौशल्यावर भरोसा करून वेगवेगळ्या क्षेत्रातले आपले नाव रोशन करण्याकरिता पुढे येतात व त्यात हे यशस्वी ही होतात.याप्रमाणेच तपोवन या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचे पुत्र चेतन येवले यांनी यांचे शिक्षण पूर्ण करून आपल्या वडिलांच्या पारंपारिक शेती कष्ट केल्यापेक्षा वेगळ्या काही उत्पन्नाचे सोर्स वाढवता येईल का या दृष्टिकोनातून आपली वाटचाल चालू केली व काही जागेवर शिक्षण घेऊन फोटोग्राफर या क्षेत्रात आपल्या ठसा उमटायला सुरुवात केली हे करत असतानाच लग्न समारंभ मोठे कार्यक्रम तसेच वेडिंग फोटोग्राफर अशा वेगवेगळ्या कामाचा भर यांच्यावर वाढत गेला याच्यात यांना एवढे यश आलेत की ये युवा उद्योजक म्हणून परिसरातने ओळखण्यात जाऊ लागले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या