🌟१५ टक्के 'आनंदाचा शिधा' शासनाने कमी दिल्याचे कारण दाखवून पुन्हा काळाबाजार करण्याची स्वस्त धान्य दुकानदारांना सुवर्णसंधी🌟
परभणी/पुर्णा (विशेष वृत्त) महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य गोरगरीब जनतेसह सरसकट शिधापत्रिका धारकांना सन उत्सवाच्या काळात अल्पदरात सनवारात लागणारी खाद्य सामग्री उपलब्ध व्हावी या शुध्द हेतूने राज्यात 'आनंदाचा शिधा' योजना कार्यान्वित केली खरी परंतु गोरगरीब जनतेच्या मुखातला घास वरबडून खाणाऱ्या मनुष्यरुपी गिधाडांनी सर्वसामान्य गोरगरीब शिधापत्रिका धारकांच्या आनंदावर विरजण घालून या आनंदाच्या शिध्यावरच डल्ला मारत वरकमाईचा आनंदोत्सव साजरा तर करण्यास सुरुवात केली नाही ना ? असा गंभीर प्रश्न जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसह पुर्णा तालुक्यात देखील उपस्थित होत असून तालुक्यातील तब्बल ११५ शासकीय स्वस्त धान्य दुकानदार असंख्य शिधापत्रिका धारकांना परभणी जिल्हा पुरवठा विभागाकडून आम्हाला केवळ ८५ टक्केच 'आनंदाचा शिधा' किट प्राप्त झाल्या असल्यामुळे आम्ही आपणास 'आनंदाचा शिधा' किट देऊ शकत नाही असे म्हणून शिधापत्रिका धारकांना हाकलून लावत असल्यामुळे १५ टक्के पुरवठा विभाग तर १५ टक्के शासकीय स्वस्त धान्य दुकानदार अशा प्रकारे पुरवठा विभाग व शासकीय स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून संयुक्तपणे तीस टक्के शिधापत्रिका धारकांच्या आनंदावर विरजण घातल्या जात असल्यामुळे शिधापत्रिका धारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पुर्णा शहरासह तालुक्यात एकूण ११५ शासकीय स्वस्त धान्य दुकानदार असून यातील जवळपास चाळीस टक्के शासकीय स्वस्त धान्य दुकानदार शिधापत्रिका धारकांच्या संपर्कातच नसल्याने आपण यांना शोधायचे तरी कशे ? या प्रश्नार्थक मुद्रेत असंख्य शिधापत्रिका धारक हातात शिधापत्रिका व पिशव्या घेऊन शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांच्या घर/दुकानांवर अक्षरशः चपला फाटोस्तर चकरा मारताना पाहावयास मिळत आहेत दसरा सन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून लवकरच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता देखील लागण्याची शक्यता असल्यामुळे जर आचारसंहिता लागली तर 'आनंदाचा शिधा' परस्पर काळ्या बाजारात विक्री करण्याची आयती संधी उपलब्ध होईल या उद्देशाने अनेक स्वस्त धान्य दुकानदार शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटपास टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर प्रकार देखील समोर येत असून या शहरातील स्वस्त धान्य दुकानदार आघाडीवर आहेत.
पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांतील राशन दुकानदाराला 'आनंदाचा शिधा' किट कमी मिळाल्या असून यात सुरवाडी ३० किट,सोन्ना ४० किट,नरापूर ३१ किट, पिंपळगाव बाळापूर ६० किट,रुपला ०७ किट अशा प्रकारे प्रत्येक राशन दुकानदारांना 'आनंदाचा शिधा' कमी मिळाल्याने ऐन विजयादशमी दिपावली सनात शिधापत्रिका धारकांना शिमगा करण्याची वेळ आली आहे पुर्णा तहसिल अंतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागाकडून तालुक्यातील ११५ शासकीय स्वस्त धान्य राशन दुकानदारांना दि.०२/०३ आक्टोंबर रोजी शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतील गहू तांदूळासह 'आनंदाचा शिधा' ज्यात रवा ०१ किलो ग्राम,साखर ०१ किलो ग्राम,चना डाळ ०१ किलो ग्राम,गोडेतेल ०१ किलो ग्राम आदी खाद्य सामग्रीचे वितरण करण्यात येऊन विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रथमतः 'आनंदाचा शिधा' तात्काळ शिधापत्रिका धारकांना वाटत करण्याचे आदेश शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आले परंतु संबंधित शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांनी २५ ते ३० टक्के शिधापत्रिका धारकांना 'आनंदाचा शिध्याचे' वाटत करुन उर्वरित शिधापत्रिका धारकांच्या हातावर वाटाण्याच्या अक्षदा देण्याचा पराक्रम राबवण्यास सुरुवात केली असून या गंभीर प्रकाराला पुरवठा विभागाकडून देखील हिरवा कंदील मिळत असल्याचे बोलले जात आहे.........
0 टिप्पण्या