🌟विजयी मुलींच्या संघाची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड🌟
पुर्णा: महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन महाविद्यालय सेलू येथे शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत श्री गुरु बुद्धीस्वामी कनिष्ठ महाविद्यालय पूर्णा मुलींच्या संघानी प्रथम क्रमांक विजय संपादन केला. विजयी संघाची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
💫 विजयी खेळाडू पुढीलप्रमाणे :
* 19 वर्षातील मुली :-
श्रुतिका विठ्ठल पौळ, अलका भास्कर इंगळे, वैष्णवी लक्ष्मण खैरे, सुरेखा बंडू पवार, प्रतिमा यशवंत राऊत, प्रणाली यशवंत राऊत, सीमा ज्ञानोबा सूर्यवंशी, वैष्णवी माधव किंगरे, दिपाली धुराजी ढेंबरे, रक्षिता शामसुंदर सिंग ठाकूर, संध्या सुदाम वाघमारे, दिव्या किशन राऊत, सानिका कैलाश राखोंडे, ऋतुजा विजय इंगोले, देविका राजेश यादव, श्रुतिका गौतम दीपके . या सर्व विजय संघाचेत्यांच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदराव कदम ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार ,उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे ,पर्यवेक्षक श्री उमाशंकर मिटकरी व श्री आबाजी खराटे यांनी अभिनंदन केले ,या स्पर्धेसाठी प्रा सतीश बरकुंटे यांनी मार्गदर्शन केले......
0 टिप्पण्या