🌟महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची कामे प्रथम प्राधान्याने करावीत.....!


🌟पुर्णेतील आढावा बैठकीत तहसिलदार माधवराव बोथीकर यांचे तालुक्यातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना निर्देश 🌟

पुर्णा (दि.१९ आक्टोंबर २०२४) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रत्येक कर्मचार्‍याला दिलेली कामे अ‍ॅक्शन मोडवर प्रथम प्राधान्याने पूर्ण करावीत अशा सूचना पुर्णा तहसिलचे तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी तालुक्यातील अधिकारी/कर्मचार्‍यांना दिल्या.

              गंगाखेड विधानसभा सार्वत्रीक निवडणूक - २०२४ च्या अनुषंगाने आज शनिवार दि.१९ आक्टोंबर रोजी पूर्णा तालुक्यातील सर्व बी.एल.ओ. व पर्यवेक्षक यांची आढावा बैठक तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय पूर्णा येथे घेण्यात आली याप्रसंगी नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पंढरीनाथ शिंदे, गट शिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर, व्यंकटेश जज्जरवार, तांत्रिक सहायक अरविंद पंडित आदींची उपस्थिती होती.

यावेळी ८५+, दिव्यांग मतदाराचे १२ डी फॉर्म, संमतीपत्र,  इतर निवडणूकीच्या अनुषंगाने आयोगामार्फत प्राप्त सुचना देण्यात देवून आढावा घेण्यात आला. तसेच मतदान केंद्र निहाय १२ डी व समंतीपत्राचे वाटप मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना करण्यात आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या