🌟राज्यातील 47 मतदारसंघात "शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना उबाठा' : मशाल-धनुष्यबाणाचा सामना🌟
✍️ मोहन चौकेकर
💫 शरद पवार साहेबांना मी दैवत मानलं, मी मुलासारखा, माझी नक्कल केली मला वेदना झाल्या; अजित पवारांचं भाष्य ; इतके दिवस वाटायचं फक्त राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेबही दिसले; अजित पवारांची डून शरद पवारांवर हसतहसत पलटवार
💫 मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक वक्तव्य ; मनसुख हिरेनची हत्या होईल हे अनिल देशमुखांना माहिती होतं की नव्हतं? देवेंद्र फडणवीस यांचा थेट सवाल ; अजित पवार यांच्याबाबत चौकशीचे आदेश आघाडीच्या काळात निघाले; पण आर आर पाटील यांच्याबाबत भाष्य करणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
💫 राधाकृष्ण विखे पाटलांविरुद्ध बैलगाडीतून जाऊन अपक्ष अर्ज भरला, भाजपनं बंडखोर नेते राजेंद्र पिपाडा यांना मुंबईला बोलावलं, शिर्डीत विमान पाठवलं ; डमी उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांना डोकेदुखी; माढ्यात 4 अभिजीत पाटील, 2 रणजीतसिंह शिंदे निवडणुकीच्या रिंगणात
💫 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मनोज जरांगेंना दिवसांतून तीनवेळा मीच का दिसतो ; आता मनोज जरांगे म्हणाले, ते माझे शत्रू नाहीत,14 महिने यांना सांगितलं होतं की तुम्ही निर्णय घ्या ; ताप आणि अशक्तपणामुळं मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, अंतरवाली सराटीत उपचार सुरु
💫 अकोल्यात सर्वपक्षीयांसमोर 'बंडोबां'चे आव्हान ; बंड शमविण्यासाठी सर्वच पक्षांत बड्या नेत्यांची धावपळ ; चंदगड, कोल्हापूर उत्तर ते करवीरपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीचे ग्रहण, 'जनसुराज्य'च्या विनय कोरेंच्या भूमिकेनं भूवया सर्वाधिक उंचावल्या!; तुळजापूरचं धोतर विधानसभेवर जाणारच, काँग्रेसच्या माजी मंत्र्यानं हाती घेतला बंडाचा झेंडा
💫 भाजपाला 'मावळ पॅटर्न'चे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळकेंचा थेट इशारा ; निवडणुकीच्या रणधुमाळीत तुतारी फुंकलेल्या राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल
💫 राज्यातील 47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना, देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक PA (स्वीयसहाय्यक ) निवडणुकीच्या रिंगणात; आर्वीतून सुमित वानखेडे यांना तिकीट
💫 पिंपरी चिंचवडमध्ये खोदकाम करताना आढळले 3 ब्रिटीशकलीन बॉम्ब; पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल ; पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; उभ्या असलेल्या क्रेनला ट्रकची धडक, 2 जण गंभीर जखमी
💫 विराट कोहली, ऋषभ पंत टॉप-10 मधून बाहेर! आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ ; दिवाळीत पडणार चौकार, षटकारांचा पाऊस! 1 नोव्हेंबरला भारत-पाकिस्तान हाँगकाँग सुपर सिक्समध्ये भिडणार
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या