🌟राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्णा शहरात पोलिस दलाचे जोरदार पथसंचलन.....!


🌟शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुर्णा पोलीस प्रशासन कमालीचे सतर्क🌟 


पुर्णा [दि.२७ आक्टोंबर २०२४] :- महाराष्ट्र राज्यात विशेष करुन परभणी जिल्ह्यात शासकीय दफ्तरी अतिसंवेदनशीलतेचा कलंक लागलेल्या जिल्ह्यातील पुर्णा शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागता कामा नये याकरिता संपूर्ण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची करडी नजर पुर्णा शहरासह तालुक्यावर असते त्यामुळे पुर्णा पोलीस प्रशासनाला प्रत्येक घडामोडींवर करडी नजर ठेवावी लागते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून त्यातच दिपावली सनालाही अवघ्या दोन तीन दिवसात सुरुवात होणार असल्याने या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पुर्णा पोलीस दलाच्या वतीने पुर्णा शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते या पथसंचलना वेळी पुर्णा पोलिस स्थानकातील पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त सशस्त्र सिमा सुरक्षा बलासह लखनौचे जवान देखील या संचलनात सहभागी झाले होते पुर्णा शहरालासह विविध परिसरांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांवर हे पथसंचलन करण्यात आले. 

पुर्णा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामधील गावांमध्ये विधानसभा निवडणूक अनुषंगाने मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात व शांततेत पार पडावी याकरिता स्थानिक पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी/कर्मचाऱ्यांसह बीएसएफ अधिकारी आणि जवानांचे विशेष पथसंचलन घेण्यात आले असल्याचे समजते स्थानिक यावेळी पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे,सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे,सहाय्यक पोलिस निरीक्षक रामकिसन नांदगावकर,पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश इंगोले,पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास पडलवार आणि बीएसएफ तुकडी अधिकारी/कर्मचारी या पथसंचलनास उपस्थित होती यावे जवानांची शिस्तबद्ध कवायतीसह पोलिस दलाचे पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी बोलतांना पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विलास गोबाळे म्हणाले की निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचे पालन करून शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी विशेष बंदोबस्त करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांची मुळीच गया केली जाणार नाही असेही यावेळी ते म्हणाले.....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या