🌟नगर परिषद प्रशासनाचे सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात धुळ झोकण्याचे अजब धोरण : चोवीस तासांत परिस्थिती जैसे थे ?🌟
पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा शहरातील मुख्य रस्त्यांच्या विकासाला बगल देऊन शहराच्या बाहेरील परिसरातील अनावश्यक ठिकाणी निर्मनुष्य वसाहतींमध्ये सिमेंट रोड/सिमेंट नाल्यांसह उद्यान (पार्क), सांस्कृतिक सभागृहांवर कोट्यावधी रुपयांची बोगस विकासकाम करुन कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची अक्षरशः धुळधाण करणाऱ्या पुर्णा नगर परिषद प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्त्यांसह महापुरुषांच्या पुतळा परिसरातील रस्त्यांच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते खड्डेयुक्त झाले असल्याचे पाहावयास मिळत असून सन उत्सव काळात या मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी करून संपूर्ण शहर खड्डेमुक्त केल्याचे सोंग करीत डागडुजीच्या नावावर पुन्हा पैशाची उधळण करण्याचा अजब प्रकार पुर्णा नगर परिषदेने आरंभल्यामुळे अल्पकालावधीतच पुर्णेकरांवर खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ वेळोवेळी येत आहे.
पुर्णा नगर परिषद प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी जिवराज डाफकर यांच्या आदेशानुसार प्रभारी मुख्याधिकारी जयवंत सोनवणे व नगर अभियंता अब्दुल हकीम यांनी विजयादशमी (दसरा) व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि.०९ आक्टोंबर २०२४ रोजी रात्री मोठ्या कॉंक्रेट मिक्सर मशीनच्या साहाय्याने अक्षरशः महापराक्रम गाजवल्यागत शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,जामा मस्जिद परिसर,नगर परिषद परिसर, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्वामी दयानंद सरस्वती चौक, रेल्वे स्थानक परिसर,बसस्थानक रोडवरील खड्ड्यांमध्ये थातुरमातुर सिमेंट/खडी/डस्टचा कालवण टाकून खड्डे बुजवण्याचे नाट्य तर रंगवले परंतु अवघ्या चोवीस/छत्तीस तासांतच या खड्डे बुजाव नाट्याचे पित्तळ उघडे पडले त्यामुळे नगर परिषद प्रशासनाचा बेजबाबदार व भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून या भागातील रस्त्यांचे पुन्हा एकदा जास्तच विद्रुपीकरण झाल्याचे निदर्शनास येत आहे.
पुर्णा नगर परिषद प्रशासनाने थातुरमातुर सिमेंट/खडी/डस्टचा वापर करुन बुजवलेल्या खड्ड्यांतील धुळवड रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील व्यापारी दुकानदार यांच्या दुकानांमध्ये उडून जात असल्यामुळे परिसरातील व्यापारी/छोटेमोठे व्यवसायिक रहिवासी त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे......
0 टिप्पण्या