🌟महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहान योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने केले आहे🌟 

परभणी (दि.07 आक्टोंबर 2024) : महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शिकाऊ उमेदवारांनी दि.03 जून 2021 पासून शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केले आहे किंवा सद्या करीत आहेत अश्या सर्व शिकाऊ उमेदवारांनी  https://maps.dvet.gov.in या पोर्टलवर नोंदणी करुन त्यांचा महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत दरमहा विद्यावेतन प्राप्त करण्यासाठी अर्ज करावेत. नोंदणी व अर्ज करतांना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उमेदवारांनी संबंधित आस्थापनांशी किंवा संबंधित मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेच्या धर्तीवर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या शासन निर्णयान्वये शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कायदाअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवुन प्रोत्साहीत करण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना राज्यात राबविणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्या-या शिकाऊ उमेदवारांना देय विद्योवेतनाच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 5 हजार यापैकी कमी असलेले विद्यावेतन शिकाऊ उमेदवारांना शासनातर्फे अनुज्ञेय आहे. परंतु राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत आणि महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना अनुज्ञेय ठरणारा विद्यावेतनाचा आर्थिक लाभ एकत्रितपणे देय एकुण विद्यावेतनाच्या 75 टक्के पेक्षा अधिक अनुज्ञेय ठरणार नाही.

योजनेची सविस्तर माहिती व अर्ज करण्याची सर्वकष माहिती https://maps.dvet.gov.in या पोर्टलवर देण्यात आलेली आहे. सर्व संबंधित आस्थापनांनी त्यांच्या अखत्यारीतील प्रशिक्षण पूर्ण केलेले व करीत असलेल्या शिकाऊ उमेदवारांनी https://maps.dvet.gov.in  या पोर्टलवर सादर केलेल्या विद्यावेतनाच्या अर्जाची तपासणी करून मान्यता द्यावी असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या