🌟पुर्णेला कस घुसी सारखं पोखरल भाऊ....अरे जातच अशी हलकट आमची आम्ही मुळासकट पोखरून खाऊ....!


🌟पुर्णा-गोदावरी नदीपात्र तस्कर माफियांच्या टोळ्या बनवून खरडून वरबडून खाऊ🌟

✍🏻'जनसामान्यांचा शाब्दिक आवाज' - चौधरी दिनेश (रणजित)

पुर्णा सहकारी साखर कारखाना वसमतला....पुर्णेचं हक्काच विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय नेलं नांदेडला....थर्मल पॉवर हाऊसही पळवल म्हण परळीला...हद्दच झाली पुर्णेच्या मराठवाडा कोच निर्मिती कारखाना गेला लातूरला आता आणखी काय काय जातांना पाहू आतातर आपण पुर्णेकर फक्त नुसतं टाळ्या वाजवत राहू....

पुर्णेला कस घुसी सारखं मुळासकट पोखरल भाऊ....अरे जातच अशी हलकट आम्हा पुढाऱ्यायची आम्ही विकासाच्या नावावर मुळासकट पोखरून खाऊ.....जात धर्म अन पंथाच्या नावावर आम्ही उजेडात एकमेकांना कचाकचा चाऊ.....जाती धर्माच्या नावाखाली बेरोजगार तरुणांच्या नावावर गुन्हेगारीचा शिक्का लाऊ....

पुर्णा-गोदावरी नदीपात्र तस्कर माफियांच्या टोळ्या बनवून खरडून वरबडून खाऊ... शासकीय निमशासकीय अन् खाजगी भुखंडावर गिधाडाय सारखा तिरपा डोळा ठेवू....कारखानदारांची दलाली करुन स्थानिक कामगारांच्या हक्क अधिकाराचा बळी देऊ.... अरें कागदी गांधींचे उपासक आम्ही सारेच एकजात भाऊ.....

पुर्णा शहराच्या माथ्यावर प्रत्येकवेळी दंगलसदृश वातावरण निर्माण करुन अतिसंवेदनशीलतेचा काळाकुट्ट कलंक लाऊ अन अंधारात मात्र समदे गल्लीबोळातले पुढारी एकाच जागी बसून शहराच्या विकासासाठी आलेला शासकीय विकासनिधी हिळुनमीळून खाऊ.....

पुर्णेला कस आम्ही घुसी सारखं पोखरल भाऊ....अरे जातच अशी हलकट आमची आम्ही मुळासकट पोखरून खाऊ.....सरड्यापरी आम्ही वेळोवेळी रंग बदलत राहू पक्षासह पक्षतत्वांची वाट लाऊन धनदांडग होऊ....धनदांडग होऊ....पुर्णेला मात्र मुळासकट पोखरून खाऊ...मुळासकट पोखरून खाऊ.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या