🌟पुर्णेतील पत्रकार भावनांमध्ये पत्रकारांनी केली महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी....!


🌟यावेळी मराठी पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले🌟 

पुर्णा (दि.०२ आक्टोंबर २०२४) :- पुर्णा शहरातील मुख्य बाजारपेठेतील नगर परिषदेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलातील पत्रकार भवनात आज बुधवार दि.०२ ऑक्टोबर रोजी दुपारी ०१.०० वाजेच्या सुमारास अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी जेष्ठ पत्रकार विजय बगाटे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मुजीब कुरेशी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या फोटोला अभिवादन करण्यात आले यावेळी दैनिक देशोन्नतीचे पत्रकार गजानन हिवरे, दैनिक सामनाचे पत्रकार दौलत भोसले दैनिक गोदातीर समाचार चे पत्रकार सुशीलकुमार दळवी,दैनिक सोलापूर तरुण भारतचे पत्रकार संपत तेली,दैनिक प्रसारचे पत्रकार मोहन लोखंडे,मो.अलीम,अमृत कराळे,शेख तोफीक आदींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या