🌟पाथरी तालुक्यातील लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरीच्या तेविसव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संपन्न....!


🌟कार्यकारी संचालक ॲड रोहित आर देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ उत्कर्षा रोहित देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न🌟


प्रतिनिधी

पाथरी:-तालुक्यातील लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स या खाजगी तत्वावरील साखर कारखाण्याच्या तेविसाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा बुधवार १६ ऑक्टोबर रोजी या साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालक ॲड रोहित आर देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ उत्कर्षा रोहित देशमुख यांच्या शुभहस्ते सकाळी १० वाजता संपन्न झाला.

या वेळी  प्रमुख उपस्थितीत या साखर कारखाण्याचे चेअरमन माजलगावचे माजी आ आर टी देशमुख जिजा,त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कुंदाताई देशमुख यांची उपस्थिती होती तर संचालक राहुल आर देशमुख डॉ अभिजीत आर देशमुख जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे हेही या वेळी उपस्थित होते.या साखर कारखाण्याची उभारणी सन २००१ साली लोकनेते केंद्रीय मंत्री स्व गोपिनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्व अशोक सेठ सामत यांनी केली होती तेव्हा पासून आजतागायत अखंड पणे उसाचे गाळप या साखर कारखाण्याने करत ऊस उत्पादक,कामगार,कर्मचारी यांना केंद्रबिंदू मानत आपली वाटचाल सुरू ठेवत सुरुवातीला प्रतिदिवस एक हजार मेट्रीकटन गाळपाने सुरू केलेल्या साखर कारखाण्याची आता प्रतिदिन २५०० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असून या वर्षी पुढील वर्षीच्या गाळपाचे नियोजन म्हणून प्रतिदिन ३५०० मे.टन गाळप क्षमता करण्या साठी व्यवस्थापण प्रयत्न करत असल्याचे चेअरमन माजी आ आर टी देशमुख जिजा यांनी सांगितले. 

गतवर्षी जवळपास दोन लाख ब्यानव हजार मे टन उसाचे गाळप या साखर कारखाण्याने करत ऊस उत्पादकांना एक रकमी २७०० रुपये दर दिला होता. या वर्षी दुष्काळी स्थिती असतांना ही पावसाळ्यात दमदार पणे पडलेल्या पावसा मुळे उसाचे उत्पादन ब-यापैकी होणार आहे. या वेळी उस तोडणी साठी या साखर कारखाण्याने चार हॉर्वेस्टर खरेदी केले असुन वाहन आणि बैलगाडीचे ही योग्यते नियोजन केले असल्याने या हंगामात तीन लक्षवर मेटन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे.

या वेळी कारखान्याचे प्रमोटर लक्ष्मीकांतराव घोडे, गंगाधरराव गायकवाड, सुदामराव सपाटे, कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे, वर्क्स मॅनेजर श्रीहरी साखरे, चीफ केमिस्ट नवनाथ चौधरी, ऑफिस मॅनेजर राजकुमार तौर, केन मॅनेजर चंद्रकांत मुखरे , डेप्युटी चीफ इंजिनिअर आढाव ,चिफ अकौटंट मुकेश रोडगे लेबर ऑफिसर रामराव कदम स्टोअर कीपर नंदीप भंडारे, सुरक्षा अधिकारी गणेश वाघमारे माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण दुगाने, मुदगलचे सरपंच लक्ष्मीकांत तिडके, लिंबा सोसायटी चेअरमन बालासाहेब सहजराव , बाबुराव दळवे, मंकजी शिंदे. विटा सरपंच कैलास आरबाड, प्रगतिशील उत्पादक शेतकरी प्रल्हादराव सपाटे, कार्तिक घुंबरे , भरत हरकाळ, प्रदीप हारकाळ, सुधाकर अरबाड पत्रकार सिद्धेश्वर गिरी तसेच मोहनराव देशमुख, कल्याणराव देशमुख, वसंत लाखे, अमोल देशमुख, सुग्रीव तिडके व कामगार कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोड वाहतूक ठेकेदार आदींची उपस्थिती होती.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या