🌟पुर्णा तालुक्यातील मौ.कंठेश्वर गावात चोरट्यांची 'रणधुमाळी' कायदा व सुव्यवस्थेला ठेंगा दाखवत बैलासह बैलगाडी चोरी...!



🌟तालुक्यातील कंठेश्वरसह आसपासच्या गावात भितीचे वातावरण🌟 


पुर्णा (दि.२९ आक्टोंबर २०२४) :
- राज्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यातही राज्य विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम असतांना व जागोजागी चेकपोस्ट लावून पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतांना मात्र पुर्णा शहरासह ग्रामीण भागात देखील चोरट्यांची 'रणधुमाळी' सुरु असून कायदा व सुव्यवस्थेला अक्षरशः ठेंगा दाखवत चोरटे चोरीच्या मुद्देमालासह अगदी सहजपणे पोबारा करीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून या चोऱ्यांच्या घटनांमुळे शहरी व ग्रामीण भागात लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून तालुक्यातील मौ.कंठेश्वर येथे तर चोरट्यांनी अक्षरशः नग्न तांडव माजवल्याचे दिसत असून आज मंगळवार दि.२९ आक्टोंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कंठेश्वर येथील शेतकरी मारोतराव कदम यांच्या शेत आखाड्यावरुन अज्ञात चोरट्यांनी चक्क बैलांसह गाडीही पळवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.


पुर्णा तालुक्यातील कंठेश्वरसह सातेगाव व परिसरातील अनेक गावांमध्ये मागील ऑगस्ट २०२४ पासून सशस्त्र चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याचे दिसत असून
 दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री अज्ञात शसस्त्र दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घालत चार घर व पानपट्टी फोडण्याची तर एका वयोवृद्ध इसमावर चाकू हल्ला केल्याची गंभीर घटना देखील घडली होती मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे तीन ते चार अज्ञात चड्डी बनियान घातलेल्या व कंबराला धारदार शस्त्र लावलेल्या दरोडेखोरांनी कंठेश्वर गावात घुसून लाखो रुपयांचा मुद्देमाल पळवला होता या घटनेचा तपास गुलदस्त्यात असतांनाच आज मंगळवार दि.२९ आक्टोंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी कंठेश्वर गावातील मारोतराव कदम यांच्या शेत आखाड्यावरुन चक्क बैलांसह गाडीही पळवल्याचा गंभीर प्रकार समोर आला असल्यामुळे गावकऱ्यांसह आसपासच्या शेतशिवारातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या