🌟गंगाखेडच्या गोदाकाठी साईसेवा चा रंगारंग दसरा🌟
गंगाखेड : सतप्रवृत्ती आणि अपप्रवृत्ती यांच्यातील संघर्ष अनादी काळापासून चालत आलेला आहे. अपप्रवृत्तींचं दहन करत मार्गक्रमण करत राहणं, हीच आपली संस्कृती असून तीचं पालन आपल्याकडून सतत होत राहिलं पाहिजे. चांगल्या कार्यात विघ्न आणनारांना बाजूला सारत चांगली कार्ये होत राहिली पाहिजेत, असे प्रतिपादन गंगाखेडचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले. श्री साईसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दसरा महोत्सवांतर्गत अपप्रवृत्ती पुतळा दहन कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर बाजार समितीचे माजी सभापती, जेष्ठ नेते बाळकाका चौधरी, विद्यमान सभापती साहेबराव भोसले, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, रासपा जिल्हाध्यक्ष ॲड. संदिप अळनुरे, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, डॉ. सौ. गीतांजली दिलीप टिपरसे, सौ. सुलभा दिपककुमार वाघमारे, श्रीमती मंगला श्रीनिवास कुलकर्णी, सौ. सुर्यमाला मोतीपवळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूसेठ सोमाणी, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष मुंडे, हाजी गफार शेख, मित्र मंडळ तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख युनूस, संजय गांधी निराधार सदस्य प्रा. पिराजी कांबळे, माजी उपनगराध्यक्ष राधाकीशन शिंदे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, ॲड. कलीम, राजू पटेल, राजेश दामा, बाबा पोले, पत्रकार प्रमोद साळवे, रमेश कातकडे, गोपी मुंडे, सखाराम बोबडे, बालासाहेब पारवे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संयोजक गोविंद यादव आदिंची ऊपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आ. डॉ. गुट्टे यांनी चांगली कामे होण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज प्रतिपादीत केली. आपण केलेल्या विविध विकासकामांची माहिती देत भविष्यातील योजनाही ऊपस्थितांसमोर मांडत आपल्या कार्याचे तटस्थपणे मुल्यमापन करण्याचे आवाहन केले. आ. गुट्टे यांचेसह मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत कल्पेश कुलकर्णी, श्री व सौ ॲड स्मिता राजू देशमुख, कृष्णा व गोपाळ सुर्यवंशी, युवराज फड, अक्षय सोडगीर, मोहन चोरघडे, वेदांत ढाकणे, सय्यद आयेशा, निशिगंधा मस्के, गंगाराममामा मसनजोगी आदिंचा गौरव करण्यात आला.
प्रिभूषन नृत्य अकादमीचे सौ प्रियंका व भूषण गाडे व संच, स्टार डान्स अकादमीचे राधे आव्हाड आणि त्यांचे सहकारी यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक सादरीकरणाने ऊपस्थितांची वाहवा मिळवली. शिवाजीनगर तांडा येथील जि प प्रशालेच्या पारंपपारिक बंजारा पेहरावात सादर केलेल्या व्यसनमुक्तीवरील कलाकृतीस प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यांनंतर झालेली नेत्रदीपक आतिषबाजी आणि ५१ पुतळी दहनावेळी ऊपस्थितांचा ऊत्साह शिगेला पोहोचला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद यादव यांनी, सुत्रसंचालन पदुदेव जोशी, भगत सुरवसे यांनी तर आभार प्रदर्शन मनोज नाव्हेकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानचे सचिव नागेश पैठणकर, गजानन महाजन, रमेश औसेकर, नंदकुमार भरड, किरण जोशी, कल्याण तुपकर, कारभारी निरस, राजेंद्र पाठक, अंबादास राठोड, गुंडेराव देशपांडे, बालासाहेब यादव, परसराम गिराम, डिगंबर यादव, विष्णू डमरे, जगदिश तोतला, गोविंद रोडे, सौ. वर्षा यादव, सौ. स्वाती पैठणकर, सौ. पुजा यादव आदिंनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यंकटेश यादव, सुहास देशमाने, प्रकाश शिंगाडे, संजय अनावडे, बाळासाहेब राखे, विठ्ठल भुसांडे, एलाप्पा शंकुवाड, राजू यादव, मोहसीनभाई धारूरवाले, किरण यादव, मारती गोरे, भागवत यादव, संजय सोनटक्के, कैलास यादव, बालासाहेब नागेश्वर आदिंसह प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमावेळी गोदाकाठ नागरिकांच्या ऊपस्थितीने फुलून गेला होता......
0 टिप्पण्या