🌟माहीममध्ये मीच जिंकणार उद्या अर्ज भरणार ; शिवसेना उमेदवार सदा सरवणकर ठाम अमित ठाकरेंचा मार्ग खडतर🌟
💫 भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; माळशिरसमधून राम सातपुतेंना उतरवलं, नुकतेच प्रवेश केलेल्या किशोर जोगरेवार यांनाही संधी ; भाजपच्या तिसऱ्या यादीत तीन विद्यमान आमदारांना डच्चू, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्याला संधी ; विदर्भातील यादीत नव्या चेहऱ्यांना संधी
💫 शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चौथी यादी ; दौंड, पुसद, खानापूरसह 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा ;कुस्तीच्या मैदानात उतरण्याआधी वस्तादाचे पैलवानांना दोन सल्ले, युगेंद्र पवारांबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, बारामतीची जनता आज नव्या पिढीतील नव्या नेतृत्त्वाचा स्वीकार करेल
💫 तुटायला वेळ लागत नाही, घर फुटल्यावरुन बारामतीमधील सभेत अजित पवार भावूक; अर्ज भरल्यानंतर बारामतीकरांना भावनिक साद ; बारामतीच्या लोकांना लोकसभेला चूक केल्यासारखं वाटतंय,आता अजितदादाच जिंकणार ; सुनेत्रा पवारांना विश्वास
💫 उद्धव ठाकरे देव होते, तुम्ही आम्हाला फसवलं; शिंदेंच्या शिवसेनेनं तिकीट कापताच श्रीनिवास वनगा आत्महत्येच्या विचारात, पत्नीचा खळबळजनक दावा ; उद्धव ठाकरेंना जबर धक्का, संभाजीनगर मध्य (औरंगाबाद मध्य ) मतदारसंघातील उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी घेतली मागे ; शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा
💫 माहीममध्ये मीच जिंकणार, उद्या अर्ज भरणार; शिवसेना उमेदवार सदा सरवणकर ठाम, अमित ठाकरेंचा मार्ग खडतर होण्याची शक्यता ; आदित्य ठाकरेंनाही शुभेच्छा; उमेदवारी अर्ज भरताच अमित ठाकरेंनी मनातलं सांगितलं, माहीममधून मीच विजयी होणार
💫 मविआचा तिढा सुटेना, वाद मिटेना; कधी जुळतंय, तर कधी तुटतंय... 10 ते 12 जागांवर मदभेद टोकाला; तोडगा निघण्याची शक्यता ; महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला, म्हणाले परिवर्तन होणार
💫 अनिल देशमुखांनी काटोल मतदारसंघातून मुलगा सलीलला उतरवलं विधानसभेच्या मैदानात; अनिल देशमुख म्हणाले, मी विधानपरिषदेवर जाणार, मंत्री होणार ; रॅली, सभा, शक्तीप्रदर्शन, पण 1 मिनिटांचा उशीर भोवला; सलील देशमुखांचा अर्ज दाखल करुन घेतलाच नाही
💫 मी मुख्यमंत्री नाही,पण उपमुख्यमंत्री होणार,आमच्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ नयेत ? अर्ज भरल्यानंतर हसन मुश्रीफांचा सवाल ; वीरेंद्र मंडलिकांच्या अर्जाची होती उत्सुकता ? हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा,अर्ज भरणार नाहीत
💫 संगमनेर मतदारसंघातील सभेत जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका ; बाळासाहेब थोरात यांचे विखे पाटलांना आव्हान, म्हणाले, तुम्ही मर्द होतात तर पळाले कशाला
💫 ‘मिर्झापूर’च्या गादीचा खेळ आता मोठ्या पडद्यावर होणार! थिएटरमध्ये रंगणार रक्तरंजित राजकारण , सिनेमाचा टीझर रिलीज
💫 झिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्वमध्ये 'भाईजान'चा पाठिंबा, शिवसेना ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंचं टेन्शन वाढण्याची शक्यता
💫bमहाविकास आघाडीत ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून शिवसेना ठाकरे गट हद्दपार
💫 भाजपने एबी फॉर्म दिलेल्या मोर्शी मतदारसंघात अजित पवारांनीही उमेदवार उतरवला, मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता
✍️ *मोहन चौकेकर*
0 टिप्पण्या