🌟महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या अपडेट /हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश🌟 

✍️ मोहन चौकेकर

💫 लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी, 15 ऑक्टोबरपर्यंत करता येईल अर्ज ; आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारकडून शासन निर्णयांचा धडाका; दहा दिवसांत 1291 शासन निर्णय 

💫 अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ; अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींची पुन्हा एकदा साद! 

💫 रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा होणार रतन टाटा यांचे उत्तराधिकारी, टाटा ट्रस्टच्या बैठकीत घोषणा; अध्यक्षपदी नियुक्ती 

💫 पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला, सीसीटीव्हीच्या आधारे तपास,महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, आरोपी सराईत गुन्हेगार 

💫 भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी, धनंजय मुंडे पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर ; राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत  उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंची तोफ, बीडमध्ये मनोज जरांगे पाटील- पंकजा मुंडेंचा जोश, नागपूर अन कोल्हापुरातही पारंपरिक मेळावा

💫 जे जे सोडून गेले त्या प्रत्येकाचा हिशोब होणार, शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या 5 मंत्र्यांचा 'कार्यक्रम' करण्यासाठी खास रणनीती ; आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं 

💫 नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सरावादरम्यान ब्लास्ट, दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू ; बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच 

💫 नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच सगळ्यांचाच जल्लोष ; सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या पुणे अन् कोकण मंडळाचा धमाका, विधानसभेपूर्वीच 18920 घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरु  

💫 यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; अणुबॉम्ब हल्ल्यातील पीडितांसाठी काम करणाऱ्या निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला बहुमान ; हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण 

💫 रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता, वैयक्तिक कारणामुळे पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं BCCI ला सांगितलं 

💫 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ, 80 कोटी लाभार्थ्यांना फायदा, मोफत तांदूळ 2028 पर्यंत मिळणार

💫 नाद खुळा कार... एलॉन मस्कच्या टेस्ला 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या