🌟वडखेल येथील विक्रम अशोक देवकते यांचे दुःखद निधन झाले होते🌟
परळी :- परळी तालुक्यातील वडखेल येथील विक्रम अशोक देवकते यांचे दुःखद निधन झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते राजेभाऊ फड यांनी देवकते कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते राजेभाऊ फड यांनी सोमवार दि.१४ ऑक्टोबर रोजी परळी विधानसभा मतदारसंघातील अनेक कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटी घेतल्या. वडखेल येथे विक्रम अशोक देवकते यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या दुःखात सहभागी होत देवकते कुटुंबीयांना धीर देऊन त्यांचे सांत्वन केले व कुटुंबीयांची विचारपूस केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे अध्यक्ष गणेश देवकते, प्रकाश मुंडे, मुक्ताराम गवळी यांच्यासह अनेकजण उपस्थितीत होते.....
0 टिप्पण्या