🌟संभाजी नगरातील एमजीएम विज्ञान केंद्राच्या अंदाजानुसार भुकंपाचा धक्का ३.८ रिश्टर स्केलचा🌟
नांदेड (दि.२२ आक्टोंबर २०२४) :- नांदेड जिल्ह्य़ातील हदगावच्या पश्चिमेस असलेल्या सावरगाव गावच्या हद्दीसह भोकर परिसरात देखील आज मंगळवार दि.२२ आक्टोंबर रोजी सकाळी भारतीय वेळेनुसार ०६.५२ वाजेच्या सुमारास ३. रिश्टर स्केलचा सौम्य भुकंपाचा धक्का जाणवला.
यावेळेस भूकंपाची खोली सुमारे पाच किलोमीटर एवढी होती याची दखल भारतीय भूकंप मापण यंत्रणेवर घेण्यात आली असल्याचे छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विज्ञान केंद्राचे श्रीनिवास औंधकर यांनी म्हटले आहे.
* हदगाव तालुक्यात केंद्रबिंदू :-
नांदेड शहर व तसेच अर्धापूर, हदगाव या तालुक्यातून आज दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 06:52 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 3.8 अशी नोंदविण्यात आलेली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून 29 किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राचे अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या