🌟सोबत घेऊन घरची शिदोरी....अकोल्यातील धम्म मेळाव्याला लाखोंची हजेरी....!


🌟अकोला येथे ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनता उपस्थित असते🌟


अकोल्यात मागील 40 वर्षांपासून धम्म मेळावा होतो हा मेळावा भारतीय बौद्ध महासभा आयोजित करते या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर संबोधित करतात ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनता उपस्थित असते काल रविवार दि.13 आक्टोंबर 20240अकोल्यात धम्म मेळावा झाला. त्यासाठी घरची भाजी-भाकरी घेऊन जनता लाखोंच्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले. 

राज्यात अनेक सभा, मेळावे होत असतात. अनेक राजकीय पक्षांनी सभेला गर्दी व्हावी यासाठी पैसे देणे, गाडी भाडे देणे हे उपाय केल्याच्या बातम्या वायरल सुद्धा झाल्या होत्या. मात्र, 40 वर्षांची परंपरा असलेल्या ऐतिहासिक धम्म मेळाव्यासाठी असे काहीही करायची गरज पडत नाही. लोक स्वतःहून स्व- खर्चाने आपल्या लाडक्या नेत्याला ऐकण्यासाठी हजेरी लावतात. 40 वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम आहे. 

धम्मचक्र_प्रवर्तन_दिन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या