🌟महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी मोठ्या जल्लोषात दाखल केला उमेदवारी अर्ज......!


🌟पार्सल जेथून आले तिकडे पाठवून द्या - आमदार संजय शिरसाट🌟 


                              
छ्त्रपती संभाजीनगर (दि.२८ आक्टोंबर २०२४) :  आजच्या भव्य दिव्य  मिरवणुकीचे स्वरूप पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरली असेल, आता जाती धर्मा चे राजकारण करतील, आमिष दाखवतील आपण सर्व सुजाण नागरिक आहात, नियोजनबद्ध काम करा, मोठ्या संख्येने मतदान करून  घेत पार्सल जेथून आले तिकडे पाठवून द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी केले.


विद्यमान आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीच्यावतीने १०८ पश्चिम विधानसभा मतदारसंघात जल्लोषात आपला उमेदवारी भरला. क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विद्यमान खासदार माजी पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, सहसंपर्क प्रमुख विकास जैन, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ,सिने अभिनेता मंगेश देसाई, भाजपा जिल्हाअध्यक्ष शिरीष बोराळकर, रीपाईचे संजय ठोकळ यांनी पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरवात झाली. मिरवणुकीत पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, सर्वत्र भगवे मय वातावरण झाले होते.

या मिरवणुकीची सांगता कोकणवाडी येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालय याठिकाणी झाली यावेळी महायुतीच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. भा ज पा जिल्हा सरचिटणीस दीपक ढाकणे यांनी सेवा, सुरक्षा, विकासासाठी आमदार संजय शिरसाट यांना चौथ्यांदा निवडून आणायचे आणि मंत्री करायचे आहे. भाजपा महिला आघाडी जिल्हा संघटक मनीषा मुंढे यांनी  महीला आदिशक्तीचे रूप आहे, आपली शक्ती आपण मतदानाच्या माध्यमातून दाखवून देण्याची वेळ आली आहे आमदार संजय शिरसाट साहेबाना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आव्हान केले.

यावेळी उपजिल्हाप्रमूख संजय बारवाल, रमेश बाहुले, अंबादास म्हस्के, युवासेना जिल्हाप्रमुख शेखर जाधव, राजेश कसूरे, तालुकाप्रमूख हनुमान भोंडवे, सरपंच सुनिल काळे, सुरेंद्र कुलकर्णी, बप्पा दळवी, गजानन बारवाल, जालिंदर शेंडगे, विनोद बनकर, विजया शिरसाट, नगरसेवक सिंद्धात शिरसाट, हर्षदा शिरसाट, तुषार शिरसाट, शिवसेना महीला आघाडी जिल्हासंघटक शिल्पाराणी वाडकर, शहर संघटक सुरेखा चव्हाण, उपजिल्हा संघटक जयश्री घाडगे, तालुकप्रमुख उषा हांडे, शैलेंद्र नीलकंठ तसेच महायुतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....                              

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या