🌟परिसरातील नागरिकांच्या जिवास धोका होण्याचे संकेत🌟
पुर्णा (दि.०७ आक्टोंबर २०२४) :- पुर्णा शहरातील सिद्धार्थ नगरातील अमोल कॉर्नर या भागात लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांचा हवेमुळे एकमेकांना सातत्याने स्पर्श होऊन त्यातून झालेल्या स्पार्किंगमुळे थिलंग्यांसह जाळ निघत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये अक्षरशः घबराट निर्माण झाली असून या भागातील नागरिक/अबालवृद्ध/महिला/लहान लेकर आपापला जिव मुठीत घेऊन वावरतांना पाहावयास मिळत असतांनाच याकडे विद्युत महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
पुर्णा शहरातील सिद्धार्थ नगर भागातच नव्हे तर अशी परिस्थिती शहरातील अनेक भागांसह ग्रामीण भागात देखील आहेत जोरदार वारा व हवेचा दाब वाढला की या विद्युत वाहिन्या एकमेकाला घासून अक्षरशः थिलंग्यांसह जाळ निघत आहे त्यामुळे येथील रहिवासी जीव मुठीत धरून वावरत आहेत स्थानिक लाईन बनला सांगितल्यावर आता साहेबाला सांगतो म्हटले जाते परंतु एखाद दुसरा लाईनमन चक्कर मारून जातो व पुन्हा येतच नाही पार्किंग सुरू झाल्यावर खांबाशेजारील घरातील लोक दारात आले तर लगेच दारे बंद करून घरात बसतात तर रस्त्यावरील वाहनधारक दुसऱ्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतात या प्रश्नावर निवेदन घेऊन गेल्यावर शहर व तालुका कार्यालय प्रतिसाद देत नाही निवेदनाच्या प्रती कचराकुंडी टाकल्या जात आहेत याविषयी शहर व तालुका अभियंता यांना मोबाईलवर संपर्क साधला असता दोन्ही महाशय फोन उचलत नाहीत लाईनमन येतात व जातात परंतु प्रतिसाद मिळत नाही पार्किंगच्या तारांना शिरा लावून वायर बांधले जातात असे बाहेर या ठिकाणी लावण्याची विनंती केली असता आमच्या ऑफिस मधील व स्टोर मधील वायर संपले आहेत येथील तेव्हा बसून देऊ अशी उडवा उडवीची उत्तरे सांगण्यात येत आहेत शहरात मुख्य रस्त्यावर असे आहे तर ग्रामीण भागात काय बोंब असेल हे सांगितले तर कळणार नाही याप्रकरणी जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे व सिद्धार्थ नगरातील अमोल कॉर्नर परिसरात उडत असलेली स्पार्किंग बंद करावी अशी विनंती येथील रहिवाशांनी केली आहे....
0 टिप्पण्या