🌟परभणी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांना पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर....!


🌟आमदार सुरेश वरपुडकर यांना आज गुरुवार दि.२४ आक्टोंबर रोजी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी जाहीर केली🌟 

 परभणी (दि.२४ आक्टोंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांना आज गुरुवार दि.२४ आक्टोंबर रोजी सायंकाळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या यादीतून उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.

               आमदार वरपुडकर हे या मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळेच वरपुडकर यांच्यासाठी पाथरी मतदारसंघ महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षासच सुटणार हे स्पष्ट होते. त्याप्रमाणे महाविकास आघाडीने पाथरी मतदारसंघ काँग्रेस पक्षास बहाल केला. पाठोपाठ काँग्रेस श्रेष्ठींनी वरपुडकर यांची उमेदवारीही जाहीर केली.

                 दरम्यान, या मतदारसंघातून वरपुडकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणूकीच्या दृष्टीने पूर्व तयारी म्हणून भक्कम अशी मोर्चेबांधणी सुरु केली. विशेषतः परभणी, मानवत, सोनपेठ व पाथरी तालुक्यातील वाडी तांड्यांपर्यंत भेटी दिल्या. ग्रामस्थांबरोबर हितगुज केले. त्यांचे सुपुत्र समशेर वरपुडकर व स्नुषा सौ. प्रेरणा वरपुडकर यांनीही स्वतंत्रपणे दौरे करीत या मतदारसंघात सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु केला होता. वरपुडकर यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क राहिला आहे. त्यामुळे एक तूल्यबळ व तगडा उमेदवार म्हणून ते पुन्हा भवितव्य आजमावित आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या