🌟निवडणूक निरीक्षक (खर्च) राहुल मिश्रा यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघाचा घेतला आढावा....!


🌟येथील निवडणूक कार्यालयात कामकाजाचा आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या🌟

परभणी (दि.23 आक्टोंबर 2024) : निवडणूक निरीक्षक (खर्च) राहुल मिश्रा यांनी पाथरी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच महत्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जनार्दन विधाते,उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी उपस्थित होते. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून पाथरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजासाठी विविध कक्ष व पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. उमेदवारांनी प्रचारादरम्यान केलेला खर्च दररोज निवडणूक कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. या खर्चावर निवडणूक विभागाची करडी नजर असते. निवडणूक आयोगाने राहुल मिश्रा यांची निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. मिश्रा यांनी आज येथील निवडणूक कार्यालयात कामकाजाचा आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या.....

***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या