🌟महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विद्यमान आ.सुरेश वरपुडकरांसह महाविकास आघाडीत पेचप्रसंग🌟
परभणी (दि.२९ आक्टोंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसू लागली असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांची महाविकास आघाडीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली पाठोपाठ वरपुडकर यांनी आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्जही दाखल केला परंतु माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपणच या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविणार आहोत असे जाहीर केले होते. मात्र गेल्या तीन दिवसांपूर्वी अपक्ष म्हणूनच उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळेच दुर्राणी यांचा उमेदवारी अर्ज दबावतंत्राचा तर भाग नाही ना अशी शंका या जिल्ह्यातील राजकीय वर्तूळात सुरु होती. परंतु बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याकडे संपर्क साधून आपणच या मतदारसंघातून राष्ट्रवादी कडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवू इच्छित आहोत असे नमूद केले पक्षश्रेष्ठींनी एबी फॉर्म द्यावा, अशी विनंतीसुध्दा केली या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात महाविकास आघाडीत मुंबई दिल्लीतील ताणा ताणीच्या घडामोडीतून दुर्राणी यांना श्रेष्ठींद्वारे पाथरीतून अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म बहाल करण्यात आला पाठोपाठ दुर्राणी यांनी मंगळवारी पाथरी तहसील कार्यालय गाठून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात आता महाविकास आघाडीतच मोठी फूट पडली आहे. दोन्ही काँग्रेसजण समोरासमोर उभे राहिले आहेत. त्याचा परिणाम लढतीवर होणार, हे स्पष्ट आहे. दोन्ही काँग्रेस जणातील ती लढत खरोखरच मैत्रीपूर्ण होणार की, माघारीच्या अंतीमक्षणी या दोघापैकी एखादा उमेदवार रिंगणातून माघार घेणार याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.......
0 टिप्पण्या